• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मराठा समाजाचे राज्य सरकारविरोधात गुहागरात निषेध

by Ganesh Dhanawade
September 5, 2023
in Guhagar
114 1
0
Protest of Maratha community against state government
224
SHARES
640
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 05 : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी (ता.अंबड) येथील मराठा समजाच्या आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केल्याचा घटनेचा निषेध करण्यासाठी गुहागर तालुका क्षत्रिय मराठा समाजाच्या वतीने सोमवारी (ता.४) गुहागर तहसील कार्यालयाच्या आवारात निषेध व्यक्त केला. Protest of Maratha community against state government

Protest of Maratha community against state government

सोमवारी सकाळी दि. १०.३० वा. गुहागर तहसील कार्यालयासमोर गुहागर तालुक्यातील विविध भागातून आलेले मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर एक मराठा, लाख मराठा.., छ. शिवाजी महाराज की जय…, उठ मराठा जागा हो, संघर्षाचा धागा हो..अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी ॲड. संकेत साळवी यांनी या निषेध सभेची माहिती दिली. त्यानंतर समाजातील अनेक पदाधिकाऱ्यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी तहसीलदार प्रतिभा वराळे यांना समाजतर्फे निषेधाचे निवेदन देण्यात आले. १ सप्टेंबर रोजी जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या अमानुष अत्याचाराचा गुहागर तालुका क्षत्रिय मराठा समाजातर्फे जाहीर व तीव्र निषेध करण्यात आला. या
घटनेमुळे गुहागर तालुक्यातील समस्त मराठा समाजाच्या भावना दुखावलेल्या आहेत. Protest of Maratha community against state government

मराठा समाजाने यापूर्वी लाखोंच्या संख्येने मूक मोर्चे काढले. त्याची दखल केवळ देशानेच नाही तर संपूर्ण जगाने घेतली आहे. मराठा समाज हा शिस्तप्रिय समाज आहे. आतापर्यंत आलेल्या प्रत्येक शासनाने आरक्षणाच्या नावाखाली मराठा समाजाची दिशाभूलच केली आहे. तरीदेखील मराठा समाजाने कधीही आक्रमक भूमिका घेतलेली नाही. मराठा समाजाच्या सहन शक्तीचा अंत पाहण्याचे काम या राज्य शासनाने केले आहे. शांततामय व लोकशाही मार्गाने देवाच्या नामाचा गजर करत आंदोलन करणाऱ्या माता भगीनींवर व वयोवृद्ध तसेच लहान मुलांवर अमानुष लाठी चार्ज करून गंभीर जखमी करणाऱ्या या सरकारचा आणि या सरकारच्या आदेशाने काम करणाऱ्या प्रशासनाचा आम्ही जाहीर निषेध करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. Protest of Maratha community against state government

पोलीस प्रशासन हे गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत येत असल्याने गृहमंत्र्यांनी समस्त मराठा समाजाची जाहीर माफी मागून आपल्या पदावरून तत्काळ पायउतार व्हावे, अशी गुहागर तालुका मराठा समाजाने केली आहे. मराठा समाजाची मागणी मान्य न झाल्यास भविष्यात मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जाण्याची तयारी राज्य सरकारने ठेवावी, असा इशारा देखील देण्यात आला. Protest of Maratha community against state government

यावेळी क्षत्रिय मराठा समाज संघटनेचे उपाध्यक्ष श्री. अनिल शिंदे, सचिव श्री. अमिष कदम, खजिनदार श्री.भगवान कदम, सहसचिव कु. निखिल साळवी, सदस्य ॲड. श्री. संकेत साळवी, श्री. शरद विचारे, श्री. सिद्धिविनायक जाधव, श्री. नंदकुमार खेतले, श्री. विक्रम कदम, श्री. मंगेश कदम, श्री. मंगेश जोशी, श्री. प्रल्हाद विचारे, श्री. अनंत चव्हाण, दिनेश कदम, भिकाजी खेतले, नामदेव पवार, अनिल मोरे, प्रसाद विचारे, शशिकांत शिंदे, राजू पवार, आशिष विचारे, कुणाल देसाई, शरद जाधव आदींसह समाज बांधव व महिला उपस्थित होत्या. Protest of Maratha community against state government

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarProtest of Maratha community against state governmentUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share90SendTweet56
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.