आमदार भास्कर जाधव, गुहागरात निषेध मोर्चा
गुहागर, ता. 30 : भारतीय जनता पार्टीला या देशात, राज्यात दंगली घडवायच्या आहेत. मतांचे ध्रुवीकरण करुन निवडणुका जिंकायच्या आहेत. मात्र शिवसेनाला हरवणे तुमच्या बापाला जमणार नाही. वर्षभरानंतर आमचे दिवस येतील त्यावेळी तुमचा हिशोब केल्याशिवाय रहाणार नाही. असे प्रतिपादन उ.बा. ठाकरे शिवसेनेचे उपनेते व गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी केले. ते गुहागरमधील मेळाव्यात बोलत होते. Protest march in Guhagar today
राज्यातील शिंदे फडणवीस सरकारला 1 वर्षपूर्ण झाल्याबद्दल आमदार भास्कर जाधव यांच्या नेतृत्त्वात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने निषेध मोर्चाचे आयोजन केले होते. शहरातील छत्रपती शिवाजी चौकातून या मोर्चाला सुरवात झाली. शिंदे फडणवीस सरकारचा धिक्कार असो, 50 खोके खातात बोके, अदानी अंबानी तुपाशी, जनता मरते उपाशी आदी घोषणा देत हा मोर्चा गुहागर तहसीलदार कार्यालयावर येवून धडकला. आमदार भास्कर जाधव, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव आदी प्रमुख कार्यकर्त्यांनी तहसीलदार सौ. प्रतिभा वराळे यांना निवेदन राज्य सरकारच्या निषेधाचे निवेदन दिले. त्यानंतर भंडारी भवन येथे उ.बा.ठाकरे शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. Protest march in Guhagar today
या मेळाव्यात बोलताना आमदार भास्कर जाधव म्हणाले की, गेल्या काही वर्षात मोर्चा, आंदोलने झाली पण त्यात माझा सहभाग नव्हता. मी विधानसभेमध्ये जनतेचे प्रश्र्न मांडून त्यांना न्याय मिळवून देत असतो. अनेक वर्षांनी आज मोर्चा सहभागी झाल्यावर जुन्या आठवणी जाग्या झाल्या. गुहागर तालुक्यात पूर्वीची शिवसेना पुन्हा एकदा उभी करु शकलो याचे समाधान आज मला आहे. आज सगळ्या क्षेत्रात भाजपने भ्रष्टाचार सुरु केला आहे. सर्व ठेकेदार त्यांच्या पसंतीचे हवेत म्हणून भाजपचे जिल्हाध्यक्ष केदार साठे आणि अन्य नेते विकास कामांमध्ये हस्तक्षेप करत आहेत. जलजीवनमध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे. त्याचवेळी उ.बा.ठा. शिवसेनेच्या आमदारांना निधी देणे थांबवले आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मंजूर झालेल्या माझ्या दिडशे कोटींच्या कामांना मिंधे सरकारने स्टे दिला आहे. हा स्टे उठवावा म्हणून आम्ही न्यायालयात गेलोय. 40 आमदार, 13 खासदार फोडून देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेना वाढत आहे. ही खरी भाजपची डोकेदुखी आहे. बिहारमध्ये भाजप विरोधी गटाचे अनेक नेते आले. पण माध्यमांमध्ये चर्चा केवळ उद्धव ठाकरे यांची होती. Protest march in Guhagar today
भारतीय जनता पार्टीला या देशात, राज्यात दंगली घडवायच्या आहेत. मुस्लीम समाजाने डोकी भडकवून घेऊ नका. तुम्ही त्यांचा हेतू यशस्वी करता आहात. त्यांना औरंगजेबाच्या नावाने राजकारण करायचे आहे. हिंदू शीख इस्लाम इसाई यांच्यात दंगली घडवायच्या आहेत. पण शिवसेनाला हरवणे तुमच्या बापाला जमणार नाही. वर्षभरानंतर आमचे दिवस आहेत. त्यावेळी तुमचा हिशोब केल्याशिवाय रहाणार नाही. त्यासाठी मी महाराष्ट्रात फिरणार आहे. त्यावेळी नारायण राणे, उदय सामंत, रामदास कदम, भाजपचे अन्य नेते माझ्या मतदारसंघात कितीही वेळा येऊ द्यात माझ्या मतदारसंघातील जनता माझ्या पाठीशी ठामपणे उभी आहे. ही जनता त्यांना नक्कीच धडा शिकवेल. Protest march in Guhagar today
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विक्रांत जाधव, तालुका प्रमुख सचिन बाईत, माजी सभापती पूर्वी निमुनकर, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य सौ. नेत्रा ठाकूर, प्रवीण ओक, महेश नाटेकर, विनायक मुळे, भंडारी समाजाचे अध्यक्ष भरत शेटे, जयदेव मोरे, रवींद्र आंबेकर, माजी सभापती विलास वाघे, सुनील पवार, सीताराम ठोंबरे, फैसल कासकर, सारिका कनगुटकर, खेड तालुका प्रमुख चंद्रकांत चाळके, चिपळूण तालुका प्रमुख संदीप सावंत, बाबा जाधव, अशोक नलावडे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख रवींद्र सुर्वे, संजय जाधव आदीसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. Protest march in Guhagar today