फास्ट ट्रॅक कोर्ट सुनावणी व्हावी व अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याची मागणी
गुहागर, ता. 30 : तलाठी सजा आडगांव रंजे ता. वसमत जि. हिंगोली येथील तलाठी संतोष देवराव पवार यांच्यावर दि. २८ ऑगस्ट रोजी तलाठी कार्यालयात भ्याड हल्ला करुन त्यांची निघृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी गुहागर मधील तलाठी यांनी लाक्षणीक संप पुकारून या घटनेचा निषेध केला आहे. तसेच आरोपीची फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये सुनावणी व्हावी, अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात यावा, भा. दं. वि. क. 353 कलमानुसार शिक्षा व्हावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. Protest in Talathi Santosh Pawar murder case
तलाठी संतोष पवार यांची निघृण हत्या झाल्यानंतर राज्यातील तलाठी, मंडळ अधिकारी यांच्यामध्ये संतापाची लाट उसळली आहे. कै. पवार हे शासकीय कर्तव्य बजावत असताना त्यांना वीर मरण आलेले आहे. त्यामुळे शासनाने कै. पवार यांना शहीद कर्मचारी म्हणून दर्जा द्यावा व तात्काळ शासनाने तसे घोषीत करावे. तसेच कै. पवार यांना निवृत्तीपर्यंत मिळणारे वेतन व लाभ हे त्यांच्या कुटुंबियांना लागु करावेत, अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे. Protest in Talathi Santosh Pawar murder case
या घटनेचा निषेध म्हणुन महाराष्ट्र राज्य तलाठी संघाने दि. २९ ऑगस्ट रोजी एक दिवसाचा लाक्षणीक संप करण्याचा निर्णय घेतलेला. या घटनेचा तिव्र शब्दात निषेध व्यक्त करुन रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्हा संघाने सदरच्या लाक्षणीक संपात सहभाग घेतला. त्यानुसार गुहागर संघटनेने या बाबतचे निवेदन तहसीलदार परिक्षित पाटील यांना दिले. त्यानंतर काळ्या फिती लावून या घटनेचा निषेध व्यक्त करत कै. पवार यांना श्रद्धांजली दिली. Protest in Talathi Santosh Pawar murder case