गुहागर, ता. 10 : राजापूर तालुक्यातील पत्रकार शशिकांत वारिशे यांची झालेली निर्घूण हत्या झाली आहे. तसेच गेल्या ८ दिवसांत केज, मुखेड व धुळे या ठिकाणी पत्रकारांवर झालेले हल्ले व खोटे गुन्हे दाखल करण्याच्या घटनांचा निषेध करण्यात येत आहे. यासाठी शुक्रवार दि. १० फेब्रुवारी रोजी संपूर्ण गुहागर तालुका प्रेस क्लब संस्थेने बैठक घेऊन निषेध व्यक्त केला. Protest by Guhagar Press Club in case of death

संघटनेची बैठक अध्यक्ष दिनेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सचिव सुरेश आंबेकर यांनी पत्रकार वारिशे अपघात मृत्यूप्रकरणाची माहिती देऊन पत्रकारांच्या न्याय, हक्क, संरक्षणासाठी सरकारकडून पावले उचलवीत, अशी अपेक्षा व्यक्त केली. दिनेश चव्हाण यांनी वारिशे अपघातमृत्यूप्रकरणाची सखोल चौकशी करुन आरोपींना कडक शिक्षा व्हावी, अशी मागणी केली. याबाबतचे निषेध पत्र सरकारी कार्यालयांना देण्याचे ठरविण्यात आले. सभ्य आणि सुसंस्कृत महाराष्ट्रात भूमिका घेऊन पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांचा आवाज कायमचा बंद केला जातो. पत्रकारांवर हल्ले करुन किंवा त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. पत्रकार संरक्षण कायदा आहे. मात्र, या कलमाखाली गुन्हे दाखल करायलाही टाळाटाळ केली जाते. त्यामुळे महाराष्ट्रात निर्भिडपणे काम करणे कठीण झाले आहे. या घटना सातत्याने वाढत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली. Protest by Guhagar Press Club in case of death
या बैठकीला प्रेस क्लबचे सर्व ज्येष्ठ पत्रकार निसारखान सरगुरोह, उमेश शिंदे, प्रशांत चव्हाण, गणेश किर्वे, विनोद चव्हाण, स्वप्नील घाग, योगेश तेलगडे, अमोल पोवळे, गजानन जाधव, संदेश कदम, लक्ष्मीकांत घोणसेपाटील, मंगेश तावडे, कृष्णकांत साळगांवकर आदी पत्रकार उपस्थित होते. Protest by Guhagar Press Club in case of death

