• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 May 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

चिपळूणमध्ये वेश्या व्यवसायाचा अड्डा उध्वस्त

by Guhagar News
June 29, 2024
in Ratnagiri
293 3
5
Prostitution base destroyed in Chiplun
575
SHARES
1.6k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

चिपळूण पोलिसांची आणखी एक धडक कारवाई

ऱत्नागिरी, ता. 29 : चिपळूण शहरातील मार्कडी भागात शालोम हॉटेलच्या मागील गल्लीत असलेल्या एका अपार्टमेंटच्या शेवटच्या मजल्यावर असणारा वेश्या व्यवसायाचा अड्डा पोलिसांनी काल शुक्रवारी रात्री उध्वस्त केला. यावेळी दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली तर एका संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले. येथे दोन एजंट होते पैकी एकला पकडण्यात पोलिसांना यश आले असून एकजण फरार झाला. Prostitution base destroyed in Chiplun

या घटनेने खळबळ उडाली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांना माहिती मिळाल्यानुसार अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलीस उपाधीक्षक राजेंद्र कुमार राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे व सहकारी सदर ठिकाणी गेले दोन दिवस पळत ठेऊन होते. पोलीस कर्मचारी व क्राईम ब्रँचच्या टीमने काल संयुक्त कारवाई केली असता ‘तिशा’मध्ये 27 व 30 वर्षे वयाच्या दोन पीडित महिला व एक पुरुष एका सदनिकेत सापडले. पोलिसांनी त्यांना व एका एजंटला ताब्यात घेतले तर एक एजंट पळून जाण्यात यशस्वी झाला. येथे गेले चार महिने वेश्या व्यवसाय चालत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी सर्वांना पोलीस स्टेशनला आणून चोकशी सुरु केली होती. रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. Prostitution base destroyed in Chiplun

Review of Guhagar Panchayat Samiti work

पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे, सहा.पोलीस निरीक्षक प्रवीण देशमुख, महिला पोलीस उपनिरीक्षक शिल्पा वेंगुर्लेकर, पोलीस उपनिरीक्षक अरुण जाधव, हवालदार वृशाल शेटकर, पो . कॉ. प्रमोद कदम, राहुल दराडे, श्री.आवळे यांच्या टीमने ही यशस्वी कामगिरी केल्याने त्यांचे कौतुक होत आहे. शहरातील काही हॉटेल व लॉजवर असे चोरटे व्यवहार होत असून त्यांचे धाबे दणाणले आहेत. Prostitution base destroyed in Chiplun

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarProstitution base destroyed in ChiplunUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share230SendTweet144
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.