रत्नागिरी, ता. 17 : चिपळूण शहरा लगतच्या राहणाऱ्या एका महिलेने आपल्याच अल्पवयीन भाचीला वेश्या व्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी रविवारी रात्री उशीरा पोलिसांनी महिलेसह दोन आरोपींना अटक केली. हा प्रकार मार्च ते एप्रिल दरम्यान घडला आहे. काल सोमवारी दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दि.१९ एप्रिलपर्यंत म्हणजे पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. Prostitution accused arrested
आरोपी तन्वी उमेश दहिवलकर (३०,रा. खेर्डी, ता.चिपळूण) या महिलेने पीडित मुलीचे आई-वडिल घरी नसताना तिला चिपळूण, रत्नागिरी, खेड, लोणावळा आदी ठिकाणच्या लॉजवर नेऊन आत्याचार करण्यात आले होते. अखेर यातून आपली सुटका करण्यासाठी तिने चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानुसार पोलिसांनी पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करून तन्वी दहिवलकर व अभिजीत पांडुरंग पवार (२५, रा. महात्मा फुले नगर, खेड) या दोघांना सोमवारी रात्री अटक केली. काल न्यायालयात हजर केले असता पाच दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. या प्रकरणी अद्याप दोन तीन आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक रविंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिल्पा वेंगुर्लेकर करीत आहेत. Prostitution accused arrested