कोतळूक शिगवणवाडी येथील खड्डे बुजविल्याने वाहन चालक समाधानी
गुहागर, ता. 09 : राज्य मार्गावरील कोतळूक शिगवणवाडी येथे पावसाचे पाणी साचून खड्डे पडले होते. याबाबत भाजपा गुहागर तालुका सरचिटणीस, कोतळूक ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्त समिती अध्यक्ष सचिन ओक यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग गुहागर यांच्याकडे खड्डा बुजविण्याची लेखी निवेदन दिले होते. त्यानुसार खड्डा बुजविण्यात आल्याने वाहन चालकांकडून समाधान व्यक्त होत आहे. Prompt consideration of demand by construction department
कोतळूक शिगवणवाडी येथे पावसाचे पाणी साचून पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत होते. मोठी दुर्घटना होण्याआधी या ठिकाणी पडलेला खड्डा बुजविण्याची लेखी निवेदनाद्वारे मागणी केली होती. सार्वजनिक बांधकाम उपविभाग गुहागर अभियंता श्री निजसुरे यांनी मागणी करणारे सचिन ओक यांच्या समवेत प्रत्यक्ष पाहणी करून जमिन मालकांजवळ चर्चा केल्यानंतर पडलेला खड्डा कामगारांकडून बुजविण्यात आला. त्यामुळे वाहन चालक समाधान व्यक्त होत आहे. Prompt consideration of demand by construction department

तसेच रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी, आवश्यक ठिकाणी असलेली गटारे काढणे ही कामेसुद्धा लवकरच सुरू करण्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले आहे. या ठिकाणी पडलेला खड्डा बुजविण्याच्या केलेल्या मागणीची तात्काळ दखल घेऊन खड्डा भरल्याने वाहन चालकांना येणारी समस्या दूर झाली आहे. त्याबद्दल सार्वजनिक बांधकाम उपविभाग गुहागरचे सचिन ओक यांनी आभार व्यक्त करत उर्वरीत कामे सुद्धा लवकरच पूर्ण करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. Prompt consideration of demand by construction department
