न्यु इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली
गुहागर, ता. 03 : सेवार्थ फाउंडेशन हे नेहमीच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात अग्रेसर राहिलेले आहेत. गुहागर तालुक्यातील न्यु इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवलीला गेल्यावर्षी 1.29 लाख रुपयेचे योगदान देऊन विद्यार्थी यांना शैक्षणिक साहित्य व गरजू विद्यार्थी यांची फी भरली होती. आणि या वर्षी संस्थेच्या आठव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून विद्यार्थीच्या गुणवत्तेत वाढ व्हावी याचा विचार करून ७० हजार किमतीचे प्रोजेक्टर संच भेट दिला आहे. Projector set gifted by Sevarth Foundation

सेवार्थ फाउंडेशनने दिलेल्या या प्रोजेक्टरमुळे विद्यार्थीना थेट ऑनलाईन लेक्चर पाहता व ऐकाता येणार आहे. तसेच आधुनिक पद्धतीने शिकवताही येणार आहे. तज्ञ् व्यक्तीचे लेक्चर व मार्गदर्शन शहरातून करण्यासाठी सुद्धा सेवार्थ संस्था प्रयत्नशील असणार आहे. या हायस्कूलसाठी अजून अनेक सेवा सुविधा देण्याचं आश्वासन या संस्थेच्या अध्यक्षा सौ.संपदा कुंटे यांच्या वतीने उपाध्यक्ष श्री रविंद्र शेळके यांनी दिले. Projector set gifted by Sevarth Foundation
यावेळी सेवार्थ फाउंडेशनचे पदाधिकारी प्रदीप पाटील, योगेश पाटील, सचिन जगदाळे, राकेश मदारकर, महेश ताम्हणकर, संदीप चव्हाण, पाटपन्हाळे संस्थेचे सहसचिव मंगेश जोशी, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष प्रदीप चव्हाण, हायस्कूलचे मुख्याध्यापक महावीर थरकार, शिक्षक प्रवीण केळस्कर, श्री. वैद्य, श्री. पुनस्कर, श्री. बागल व विद्यार्थी उपस्थित होते. Projector set gifted by Sevarth Foundation
