जिंदाल विद्यामंदिरने मिळवला प्रथम व द्वितीय क्रमांक, खेडचे नवभारत तृतीय
गुहागर, ता. 05 : वेळणेश्र्वरमधील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाने (Maharishi Parashuram College of Engineering) प्रकल्प 2023 ही अभिनव स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत जिंदाल विद्यामंदिर जयगडच्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या ब्रेन बाईट प्रकल्पाला प्रथम, मोरबी ब्रिजला द्वितीय तर खेड भरणे नाका येथील नवभारतच्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या लूप एनर्जी या प्रकल्पाला तृतीय क्रमांकाने गौरविण्यात आले. भाभा अणुसंशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. Project 2023 Competition at Maharishi Parashuram College
महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाने रत्नागिरी जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयात शास्त्र शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी समुहाद्वारे विज्ञान प्रकल्प बनविण्याची स्पर्धा आयोजित केली होती. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील सुमारे १७ कनिष्ठ महाविद्यालयांत जाऊन वेळणेश्वरच्या प्राध्यापकांनी स्पर्धेचे स्वरूप समजावून सांगितले. स्पर्धकांची नोंदणी केली. त्यानंतर सुमारे 10 दिवसांनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापकांनी महाविद्यालय स्तरावर परिक्षण करुन प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालयातून 3 गटांची निवड दुसऱ्या टप्प्यातील स्पर्धेसाठी केली. दुसऱ्या टप्प्यातील स्पर्धा महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात घेण्यात आली. Project 2023 Competition at Maharishi Parashuram College
यावेळी 51 गटांच्या प्रकल्पांची पहाणी भाभा अणुसंशोधन केंद्रातील 14 निवृत्त शास्त्रज्ञांनी केली. यामध्ये तृतीय क्रमांक भरणे नाका, खेड येथील नवभारत ज्युनियर कॉलेजच्या राज दिनेश शिर्के आणि अजित मंगेश खेडेकर या अकरावी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी पटकावला. या विद्यार्थ्यांनी विद्युत अभियांत्रिकीशी निगडित असा लूप एनर्जी वर आधारित प्रकल्प बनवला होता. द्वितीय क्रमांक जयगड येथील जिंदाल विद्यामंदिरच्या साहिल प्रवीण वेल्हाळ आणि आयुश संतोष वाघे या विद्यार्थ्यांनी पटकावला. या विद्यार्थ्यांनी ‘मोरबी ब्रिज’ नावाचा प्रकल्प तयार केला होता. प्रथम क्रमांक जिंदाल विद्यामंदिरच्या पार्थ दिनेश माने, साहिल दिलीप बने आणि गौरांगी प्रमोद पडवळे या विद्यार्थ्यांच्या गटाने पटकावला. त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशल इंटेलिजन्सवर आधारित ब्रेन बाईट हा प्रकल्प बनविला होता. Project 2023 Competition at Maharishi Parashuram College
या स्पर्धेचा बक्षिस वितरण कार्यक्रम महाविद्यालयातील नाना फडणवीस सभागृहात झाला. यावेळी जिल्ह्यातील 17 कनिष्ठ महाविद्यालयातील 350 हून अधिक विद्यार्थी व 51 शिक्षक उपस्थित होते. ही स्पर्धा आगळी वेगळी असल्याने निकालाची उत्कंठा सर्वांनाच होती. त्यामुळे बक्षिस वितरणाचे वेळी सभागृहात हर्षोल्लासाचे वातावरण होते. सर्वच शास्त्रज्ञांनी सर्व स्पर्धकांचे भरभरुन कौतुक केले. या स्पर्धेच्या यशस्वीततेकरिता विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. विजय बेडेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र सोनी, विद्युत अभियांत्रिकी विभागप्रमुख तथा या स्पर्धेचे मुख्य समन्वयक श्री. सतिश घोरपडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच महाविद्यालयाच्या सर्वच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एक महिना विशेष मेहनत घेतली. Project 2023 Competition at Maharishi Parashuram College