रत्नागिरी, ता. 25 : जागतिक पर्यटन दिनानिमित्त रत्नागिरीत सॅटर्डे क्लब, श्री दर्या सागर पर्यटन व सेवा सहकारी संस्था, रत्नागिरी हॉटेल असोसिएशन, निसर्गयात्री, असीमित व अन्य संस्थांच्या यांच्या संयुक्त विद्यमाने अथांग ते उत्तुंग हा कार्यक्रम दि. २७ सप्टेंबर २०२४ रोजी दु. ३.०० वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात आयोजन केले आहे. Program on the occasion of Tourism Day in Ratnagiri
या कार्यक्रमात वारसास्थळ संवर्धन सल्लागार तेजस्वीनी आफळे, लेखक आणि साहसी पर्यटनाचे महाराष्ट्रातले प्रणेते वसंत वसंत लिमये, पितांबरी उद्योग समुहाचे संचालक रवींद्र प्रभुदेसाई, रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकुमार पुजार, रत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष रमेश कीर, सॅटर्डे क्लबचे वेबसाईड सेल हेड गिरीश घुगरे आणि कोकण रिजन हेड राम कोळवणकर, इन्फिगो आय हॉस्पीटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. Program on the occasion of Tourism Day in Ratnagiri
जिल्ह्याला निसर्ग, इतिहास आणि परंपरा यांचा फार मोठा वारसा लाभलेला आहे. अथांग अशा समुद्रापासून ते रांगड्या सह्याद्रीपर्यंत पसरलेल्या आपल्या जिल्ह्यात सर्वच बाबतीत फार मोठी विविधता बघायला मिळते. याच सोबत सह्याद्रीच्या काळ्या कातळापासून ते सड्यांवरच्या जांभ्याच्या पठारापर्यंतची भूवैविधता देखील पहायला मिळते. समुद्र किनाऱ्यांवरचे सागरी दूर्ग ते कड्याकपारीतले डोंगरी दूर्ग, रमणीय समुद्रकिनाऱ्यांपासून ते गिरिस्थानांपर्यंत, अभ्यासकांना आणि पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या असंख्य गोष्टी आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत. आणि आता रत्नागिरीच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा सामिल होतो आहे ते म्हणजे आपल्या जिल्ह्यातली ९ ठिकाणे जागतिक वारसास्थळांच्या संभाव्य यादीत नोंद होताहेत. यातून पर्यटनाच्या नवीन संधी आणि व्यवसायाची नवीन दालने उघडणार आहेत. Program on the occasion of Tourism Day in Ratnagiri
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कोकणभूमी कृषी पर्यटन सहकारी संस्था कोकण प्रांत, रत्नागिरी शहर पर्यटन सहकारी संस्था, गणपतीपुळे हॉटेल असोसिएशन, पर्यटन व्यावसायिक महासंघ, कोकण विभाग, कोकण पर्यटन सहकारी संस्था, देवरूख, गुहागर लॉज व हॉटेल असोसिएशन, अपरांत भूमी पर्यटन विकास संस्था, ग्लोबल चिपळूण, ग्लोबल लांजा, माय राजापूर, मित्र मेळा राजापूर, सुवर्णसूर्य फाऊंडेशन, निवेदिता प्रतिष्ठान दापोली या संस्थांचे सहकार्य लाभले आहे. तरी सर्व पर्यटनप्रेमी, व्यावसायिक आणि पूरक व्यावसायिक यांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. Program on the occasion of Tourism Day in Ratnagiri