हिंदू गर्जना प्रतिष्ठान तर्फे आयोजन
गुहागर, ता. 04 : दाभोळ येथे शिवजयंती उत्सवानिमित्त हिंदू गर्जना प्रतिष्ठान दाभोळच्या वतीने विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये खुली भव्य मॅरेथॉन स्पर्धा, मोटर सायकल रॅली, महिलांसाठी हळदीकुंकू, ऐतिहासिक वेशभूषा, व्याख्यान इत्यादी कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. Program on the occasion of Shiv Jayanti at Dabhol
शिवजयंती उत्सवानिमित्त दि. 12/02/2023 रोजी स. 8 वा. धोपावे फेरीबोट ते गोपाळगड अशी खुली भव्य मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी 15 वर्षापुढील स्पर्धकांनी भाग घ्यावा. तसेच स्पर्धकांनी आपली नाव दि. 10/02/2023 पूर्वी नोंदणी करावीत. नाव नोंदणीसाठी श्री नितीन यादव 9975839121, श्री. सिध्देश वैद्य 9763866999, श्री. परेश गुजराथी 9527194611, श्री. मनिष मोरे 9404335567, श्री. रोहन केलसकर 9764610510 याचेकडे संपर्क साधण्यात यावा. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक 10000/- व्दीतीय क्रमांक 7000/- तृतीय क्रमांक 5000/- आणि सन्मानचिन्ह अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. Program on the occasion of Shiv Jayanti at Dabhol
दि. 18/02/2023 रोजी दुपारी 3 वा. सिमेवरील गणपती मंदिर येथून मोटर सायकल रॅली सुरु होऊन भाटी व पुन्हा तिकडून येऊन जुने पोलीस स्टेशन, भंडारवाडा ते लोकमान्य टिळक विद्यालयाच्या प्रांगणात समाप्त होईल. त्यानंतर सायं. 5 ते 6.30 वा. महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आयोजित केला आहे. सायं 6.30 वा लोकमान्य टिळक विद्यालय दाभोळचे पटांगणात लहान मुलांचे ऐतिहासिक वेशभूषा प्रदर्शन घेण्यात येणार आहे. व त्यानंतर सरखेल कान्होजी आंग्रे यांचे 9 वे वंशज, श्री शिवाजीराजे रायगड स्मारक मंडळाचे अध्यक्ष व किल्ले रायगड विकास प्राधिकरणाचे सदस्य श्री. रघुजीराजे आंग्रे यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. Program on the occasion of Shiv Jayanti at Dabhol
टिप – सर्व मोटार सायकल चालकांचे लायसन्स व गाडीचे कागदपत्र सोबत असावीत. तसेच मोटार सायकलवर दोघांव्यतिरिक्त कुणाला बसवू नये. सोबत झेंडे आणावेत.
दि. 19/02/2023 रोजी स. 8.30 वा सिमेवरील गणपती मंदिरामध्ये श्रींचे पुजन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पूजा करण्यात येणार आहे. त्यानंतर स. 9 वा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. तरी शिवप्रेमींनी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. अशी विनंती हिंदू गर्जना प्रतिष्ठान दाभोळच्या वतीने करण्यात आली आहे. Program on the occasion of Shiv Jayanti at Dabhol
