रथयात्रा, कारसेवकांचा सत्कार, रामनाम जप, पुष्पवृष्टी व रात्री गीतरामायण रंगणार
गुहागर, ता. 20 : तालुक्यातील आरे गावातील श्रीराम मंदिरामध्ये अयोध्येतील मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त दि. २२ जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा मोठया दिमाखात साजरा होणार आहे. या सोहळ्यामध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष महेश भोसले व सर्व ट्रस्टींनी केले आहे. Program at Aare Ram Mandir
अयोध्येतील राम मंदिरासाठी ५०० वर्षे सर्व हिंदूंनी लढा दिला त्यात अनेक रामभक्त हुतात्मे झाले. परंतु त्यांचे बलिदान व्यर्थ गेले नाही. आज त्याच जागेवर प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर उभे राहीले आहे. म्हणून सोमवारी २२ जानेवारी हा विजय दिवस साजरा करताना श्रीराम मंदिर देवस्थान आरे येथे सर्व भक्तगणांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. Program at Aare Ram Mandir


सकाळी ८ वाजता श्रीरामांची षोडशोपचार पूजा, ९ वाजता हनुमंत मंदिर ते श्रीराम मंदिर या मार्गावरून रथयात्रा, सकाळी १०.१५ वाजता श्रीराम यज्ञआरंभ, ११.४५ वाजता १९९० आणि ९२ मधील गुहागरमधून गेलेले कारसेवक यांचा सत्कार आणि त्यांचे मनोगत, दुपारी १२.२० पासून रामनाम जप, दुपारी १२.२९ वाजता श्रीराम नाम गजरात पुष्पवृष्टी, त्यानंतर आरती, महाप्रसाद. सायंकाळी ७ वाजता दिव्यांची रोषणाई आणि आरती. तर रात्री १० ते १२ या वेळेत सावर्डे येथील ओंकार कलासाधना ग्रुप यांचे गीतरामायण, अभंग, नाटयसंगीत व गौळणी कार्यक्रम सादर होणार आहे. Program at Aare Ram Mandir