रत्नागिरी, ता. 08 : क्षत्रिय मराठा मंडळ, रत्नागिरीतर्फे दरवर्षी तिथीप्रमाणे दि. १७ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त जयस्तंभ ते मारुती मंदिर या मार्गावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीची सवाद्य मिरवणूक तथा शोभायात्रा काढण्यात येते. या शोभायात्रेला रत्नागिरी शहरासह आसपासच्या गावांतील शेकडो मराठा बंधू-भगिनी पारंपरिक वेषभूषेत सहभागी होणार आहेत. Procession on the occasion of Shiv Jayanti
शोभायात्रेला १७ रोजी सायंकाळी ५.३० वाजता जयस्तंभ येथून सुरवात होऊन रात्री १० वाजता मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सांगता होणार आहे. प्रथेप्रमाणे सायंकाळी ४ वाजता रत्नदुर्ग किल्ल्यावरील देवी भगवती मंदिर येथून शिवज्योतीचे प्रस्थान होऊन सायंकाळी ५.३० वाजता जयस्तंभ येथे आगमन झाल्यानंतर छत्रपती महाराजांच्या पालखीचे मिरवणुकीला आरंभ होईल. Procession on the occasion of Shiv Jayanti


प्रतिवर्षाप्रमाणे क्षत्रिय मराठा मंडळाच्या वतीने तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव येत्या १७ मार्च रोजी साजरा केला जाणार आहे. यानिमित्त शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेत विविध ढोल, ताशे, झांजपथक, मर्दानी खेळ आणि महाराजांच्या जीवनावरील चित्ररथांचा समावेश आहे. ज्यांना चित्ररथांचा समावेश करायचा आहे त्यांनी मंडळाचे पदाधिकारी राकेश नलावडे, प्राचीताई शिंदे, प्रदीप साळवी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन क्षत्रिय मराठा मंडळाचे अध्यक्ष सुरेशराव सुर्वे यांनी केले आहे. Procession on the occasion of Shiv Jayanti
रत्नागिरी शहर व पंचक्रोशीतील सर्व मराठा समाज बांधव एकत्र येऊन ही शोभायात्रा आयोजित करण्यात येत आहे. रत्नागिरी पंचक्रोशीतील गावातून देखावा चित्ररथ करणार असतील तर क्षत्रिय मराठा मंडळाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. Procession on the occasion of Shiv Jayanti