राम भक्त वैभव खेडेकर ; श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा आणि मंदिराचा जिर्णोद्धारानिमित्त
गुहागर, ता. 19 : आपल्या सर्वांच्या श्रद्धेचा आस्थेचा विषय असलेला अयोध्या येथे जिर्णोद्धार झालेले श्री रामाचे भव्य मंदिर. हे मंदिर व्हावे हि अनेक हिंदू आणि भारतीयांची इच्छा होती. आज आपण सर्वांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण होताना पाहून आनंद होत आहे. दि २२ जानेवारी रोजी रामलल्ला रामजन्मभूमी येथे श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा आणि मंदिराचा जिर्णोद्धार होत आहे. या निमित्ताने एक रामभक्त म्हणून वैभव खेडेकर यांना खेडमध्येही हा उत्सव व्हावा असे वाटते. Procession of Sri Rama in Khed

तरी खेड वासीयांच्या वतीने दि २२ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ठीक ११:०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून भव्य शोभायात्रा निघणार आहे. या शोभायात्रेत प्रभू श्री रामांचा रथ, हिसार हरियाणा येथील १० फुटी रामभक्त हनुमान, घोडे, उंट यांची सवाद्य मिरवणूक निघणार आहे. या निमित्ताने सर्वांना साखर वाटप तसेच शोभायात्रेत सहभागी होणाऱ्यांना टोप्या, गळ्यातील पट्टे, बॅच आणि झेंडे वाटप होणार आहे. तरी सर्व धर्माभिमानी नागरिकांनी विविध वेशभूषा करून ह्या शोभायात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन खेड वासीयांकडून करण्यात आले आहे. Procession of Sri Rama in Khed