• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मोडकाआगर येथील महामार्गाचा प्रश्र्नही सुटणार?

by Mayuresh Patnakar
March 4, 2023
in Guhagar
251 3
0
The highway problem at Modkaagar will be solved

जून 2021 पासून मोडकाआगर येथील रस्त्याचे रखडलेले काम

494
SHARES
1.4k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 04 : भुसंपादन न करताच महामार्गाचे काम रेटून नेण्याच्या मानसिकतेला महेंद्र आरेकरांनी छेद दिला. थेट न्यायालयात याचिका दाखल केल्याने मोडकाआगर पुलापासून मोडकाआगर नाक्यापर्यंतचे काम  जून 2021 पासून  रेंगाळले. आता जागा मालक महेंद्र आरेकर यांच्यासोबत बोलणी करुन या विषयावर मार्ग काढण्यासाठी शासकीय यंत्रणा सकारात्मक दिसत आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून प्रलंबित राहीलेला हा प्रश्र्न लवकरात लवकर सोडवला जाईल असे वातावरण तयार झाले आहे. The highway problem at Modkaagar will be solved

मोडकाआगर नवा पुल ते मोडकाआगर नाका या परिसरातील महेंद्र आरेकर यांची जागा वरवेली ग्रामपंचायत हद्दीत येते. सार्वजनिक बांधकाम विभागाने हस्तांतरीत केलेला गुहागर विजापूर जुना रस्ता गुहागरच्या हद्दीतून जातो. परंतु हा रस्ता धरणाखाली गेल्यानंतर वापरात आलेला रस्ता वरवेली ग्रामपंचायतीच्या हद्दीतील महेंद्र आरेकर यांच्या खासगी जागेतून गेला आहे. मात्र संबंधित विभागाने या रस्त्याची नोंद सरकार दफ्तरी केली नाही. परिणामी महामार्गाचे काम करताना मोडकाआगर धरणावरील पुल आणि नवा रस्ता बांधण्यासाठी हाच जुना रस्ता गृहित धरण्यात आला. याच रस्त्याला महेंद्र आरेकर यांनी हरकत घेतली. The highway problem at Modkaagar will be solved

याबाबत महेंद्र आरेकर यांचे म्हणणे आहे की, शासनाने आमच्या खासगी मालमत्तेतून गेलल्या रस्त्याची नोंद दाखवावी. सदर रस्त्याची रुंदी किती आहे याची माहिती द्यावी. आणि महामार्गासाठी उर्वरित जागा मोबदला देवून अधिग्रहीत करावी. परंतु शासकीय यंत्रणा महेंद्र आरेकरांना समाधानकारक उत्तर देवू शकल्या नाहीत. त्यामुळे महेंद्र आरेकर यांनी थेट न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे गेली दोन वर्ष मोडकाआगर धरणावरील पुल वापरण्यास सुरवात होवूनही नवा पुल ते मोडकाआगर नाका येथील रस्ता पुर्णत्वास जाऊ शकलेला नाही. The highway problem at Modkaagar will be solved

शुक्रवारी (ता. 3) प्रांत प्रविण पवार यांच्या अध्यक्षतेखाली गुहागर तहसील कार्यालयात महामार्गाचे अर्धवट काम, न्यायालय ते शुन्य कि.मी. पर्यंत महामार्गाचे काम, भुसंपादन, मोबदला या विषयांवर बैठक झाली. या बैठकीच्या शेवटी महेंद्र आरेकर, ॲड. सौ. मनाली आरेकर यांच्याजवळ प्रांत प्रविण पवार यांनी चर्चा केली. The highway problem at Modkaagar will be solved

यासंदर्भात बोलताना महेंद्र आरेकर म्हणाले की, आजची चर्चा सकारत्मक होती. प्रांतांनी संबंधित रस्त्यांचे कोणतेच कागदपत्र शासनाकडे शोधुन आजपर्यंत सापडले नसल्याचे सांगितले. आम्ही रस्त्यासाठी जागा देण्यास तयार आहोत मात्र आवश्यक त्या जागेची मोजणी करुन शासनाने जागा अधिग्रहीत करावी. योग्य मोबदला द्यावा. अशी भुमिका मांडली. त्याला प्रांतांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. संबंधित सर्व विभागांबरोबर एकत्रित बैठक घेवून रस्त्याचा विषय निकाली काढण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्र्वासन दिले आहे. The highway problem at Modkaagar will be solved

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarThe highway problem at Modkaagar will be solvedUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share198SendTweet124
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.