क्षितिज वॉरिअर्स उपविजेता; श्री दत्त प्रासादिक देवकर मंडळ आरे आयोजित
गुहागर, ता. 28 : तालुक्यातील आरे येथील श्री दत्त प्रासादिक देवकर मंडळाने मॅटवरील प्रो कबड्डी लीग स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धांमध्ये निलेश मनोहर मोरे यांच्या गुहागर जिमखाना संघाने प्रथम, तर साईनाथ कळझुणकर यांच्या क्षितीज वॉरिअर्स, आरे संघाने द्वितीय, तृतीय क्रमाक पद्माकर आरेकर व मंदार कचरेकर यांच्या एनसीपी गुहागर संघाने तर चतुर्थ क्रमांक संगीता भाटकर यांच्या चंद्रभागा फायटर्स संघाने पटकाविला. Pro Kabaddi League Competition at Aare


या स्पर्धेत विजेत्या संघाना रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू तेजस धामणस्कर (गुहागर जिमखाना), उत्कृष्ट पक्कड, सार्थक ठाकूर (गुहागर जिमखाना), उत्कृष्ट चढाई अविनाश शेटे (क्षितीज वॉरिअर्स), अंतीम सामन्यातील सामनावीर म्हणून शुभम भोसले (गुहागर जिमखाना) यांना भेटवस्तू देवून गौरविण्यात आले. Pro Kabaddi League Competition at Aare


स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाला श्रीराम मंदीर देवस्थान आरेचे संस्थापक अध्यक्ष महेश भोसले, मुन्ना देसाई, ॲड. दिगंबर देवकर, गुहागर ता.कबड्डी असो. अध्यक्ष नीलेश मोरे, गुहागर जीम खाना अध्यक्ष नीलेश मोरे, संदीप भोसले, श्री दत्त प्रासादिक देवकर मंडळ अध्यक्ष संदिप देवकर, संदीप (भैया) देवकर, रमेश देवकर, शैलेश देवकर, संजोग देवकर, गुहागर शिवसेना तालुकाप्रमुख दिपक कनगुटकर, संगीता हळदणकर आदी मान्यवर उपस्थित होते. या कबड्डी स्पर्धेसाठी पंच प्रमुख समित घाणेकर तर पंच म्हणून आशुतोष साळुंखे, विलास बेंद्रे, समीर जांगळी, वृषाल सुर्वे, स्नेहल ओक, प्रभू हंबर्डे, दिनेश खेडेकर, तुषार पाटील, दिनेश रुके यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक देवकर यांनी केले. Pro Kabaddi League Competition at Aare

