रत्नागिरी, ता. 06 : रत्नागिरी जिल्हा करसल्लागार असोसिएशन आणि सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे आयोजित क्रीडा महोत्सवाचे बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी स्वयंसेवक व स्पर्धांमधील पंच यांचा प्रातिनिधीक सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच उज्ज्वला क्लासेसच्या वतीने काही बक्षीसे पुरुषोत्तम पाध्ये व सीए शरद वझे यांच्या हस्ते देण्यात आली. Prize distribution of sports events in Ratnagiri

या स्पर्धांचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय खो- खो पटू अपेक्षा सुतार हिच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले होते. या स्पर्धा गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या जवाहर क्रीडांगणावर तीन दिवस सुरू होत्या. यांचे बक्षीस वितरण ज्येष्ठ सीए श्रीकांत भाऊ वैद्य, करसल्लागार असोसिएशनचे अध्यक्ष सीए वरद पंडित, सीए ब्रॅंचचे अध्यक्ष सीए प्रसाद आचरेकर, एंजल ब्रोकिंगचे राजेश सोहोनी यांच्या हस्ते करण्यात आले. Prize distribution of sports events in Ratnagiri

स्पर्धेचा सविस्तर निकाल (विजेता, उपविजेता या क्रमाने)
बुद्धिबळ – वरद पेठे व वल्लभ महाबळ, कॅरम एकेरी- संदीप चव्हाण व सीए आयेशा अघाडी, कॅरम दुहेरी- केतन रहाटे व वरद पटवर्धन, योगेश भावे व जहूर हकीम. बॅडमिंटन पुरुष दुहेरी- केतन रहाटे व वरद पटवर्धन, राजेश सोहोनी व अथर्व करंदीकर. बॅडमिंटन पुरुष विद्यार्थी- अपूर्व मुळ्ये व अथर्व करंदीकर. बॅडमिंटन पुरुष एकेरी- वरद पटवर्धन व राजेश सोहोनी, बॅडमिंटन महिला एकेरी- सांची डांगे व तन्वी कामत. क्रिकेट- स्टूडंट्स ११, मेंबर्स सुपर ११, सामनावीर- केतन रहाटे, सोहन चुंबळकर, मंदार गाडगीळ, वरद पटवर्धन, अनिश गांगण. मालिकावीर- सोहन चुंबळकर. Prize distribution of sports events in Ratnagiri
कार्यक्रमावेळी ज्येष्ठ सीए, ज्येष्ठ करसल्लागार, कर्मचारी, सीए वैभव देवधर, सीए अभिजित पटवर्धन, सीए मंदार गाडगीळ, सीए श्रीरंग वैद्य, सीए केदार करंबेळकर, सीए अभिलाषा मुळ्ये, सीए शैलेश हळबे आदी उपस्थित होते. Prize distribution of sports events in Ratnagiri

