• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

श्रीमती अन्नपूर्णा श्रीधर वैद्य प्रा. विद्यालयात बक्षीस समारंभ

by Manoj Bavdhankar
April 4, 2023
in Guhagar
106 1
0
Prize Ceremony of Annapurna Vidyalaya
208
SHARES
594
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

विद्यार्थ्यांनी कलात्मक ज्ञान व शारीरिक क्षमता वाढविली पाहिजे; शैलेंद्र खातू

गुहागर, ता. 04 : स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी शालेय अभ्यासाबरोबरच कलात्मक ज्ञान व शारीरिक क्षमता वाढविली पाहिजे, असे आवाहन खातू मसालेचे शैलेंद्र खातू यांनी केले. श्रीमती अन्नपूर्णा श्रीधर वैद्य प्राथमिक विद्यालय यांच्या वार्षिक बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. Prize Ceremony of Annapurna Vidyalaya

Prize Ceremony of Annapurna Vidyalaya

खातू पुढे म्हणाले की, या शाळेतून आमचे शिक्षण झाले असून नेहमीच शाळेसाठी सर्वतोपरी सहकार्य राहील. शिक्षक संजय गमरे म्हणाले की, 1999 साली संस्थेने लावलेल्या विद्यालयाच्या रोपट्याचे रूपांतर आज वटवृक्षात झाले आहे. मुख्याध्यापक समीर गुरव म्हणाले की,  वाढत्या झाडाप्रमाणे विद्यार्थी असून वेळीच त्याच्या मधील अनावश्यक फांद्या छाटल्या तर भविष्यात बहारदार वृक्षा प्रमाणे विद्यार्थी ज्ञानाने बहरतो. तसेच व्यासपीठावरील माजी विद्यार्थी अभिजीत मर्दा, कौस्तुभ गद्रे, सुनीत आठवले, आकांक्षा पोतदार, पालक प्रतिनिधी विकास मालप, राधा आरेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. Prize Ceremony of Annapurna Vidyalaya

यावेळी १ ली ते ४ थी मधील बेस्ट ऑल राऊंड अनुक्रमे सेजल संजय पाटील, साकेत समीर गुरव, नेत्राली निखील ओक, दुर्वा दशरथ नाटेकर व १ ली ते ४ थी मधून एक सर्वोत्कृष्ट विद्यार्थीनी ईशा केदार परचुरे यांचा तसेच विविध प्रकारात यशस्वी विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. Prize Ceremony of Annapurna Vidyalaya

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarPrize Ceremony of Annapurna VidyalayaUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share83SendTweet52
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.