गुहागर, ता. 08 : आजच्या विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात टिकायचे असल्यास कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नसल्याचे मत गुहागर प्राथमिक रुग्णालयाचे डॉक्टर निलेश कुमार ढेरे यांनी व्यक्त केले. ते श्रीमती अन्नपूर्णा श्रीधर वैद्य प्राथमिक विद्यालय गुहागर या शाळेच्या बक्षीस समारंभ कार्यक्रमात बोलत होते. Prize ceremony at Annapurna Sridhar Vaidya Vidyalaya


यावेळी 2024-25 बेस्ट ऑल राऊंडर विद्यार्थी इयत्ता पहिली गार्गी विकास निमकर, इयत्ता दुसरी अन्वी मनोज बने, इयत्ता तिसरी साई राजेंद्र गोडसे, इयत्ता चौथी अभिज्ञा दिनेश पवार या यशस्वी विद्यार्थ्यांना मेडल प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. इयत्ता पहिली ते चौथी मधून सर्वोत्कृष्ट विद्यार्थी साकेत समीर गुरव याची निवड होऊन याला रोख 1000 रुपये व मेडल व भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. शिष्यवृत्तीधारक साकेत समीर गुरव, अभिज्ञा दिनेश पवार, ज्ञानदा निलेश ढेरे, ऋग्वेद विक्रांत खरे तसेच अपंग पुनर्वसन संस्थेसाठी उत्कृष्ट निधी संकलन केले म्हणून विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या सत्कार कार्यक्रमाला पालक वर्ग व कर्मचारी उपस्थित होते. Prize ceremony at Annapurna Sridhar Vaidya Vidyalaya


यावेळी व्यासपीठावर गुहागर एज्युकेशन सोसायटीचे संचालक राकेश साखरकर, पदसिद्ध सदस्य शामल आरेकर, पत्रकार मंदार गोयथळे, मुख्याध्यापक समीर गुरव, शिक्षक संजय गमरे, प्रणाली बेंडल, जोशना गमरे, सायली आवटे, समिती सदस्य संदीप बागकर, स्वप्नगंधा डीगे उपस्थित होते. Prize ceremony at Annapurna Sridhar Vaidya Vidyalaya