• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
11 July 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

शिक्षकांच्या प्रश्नांवर निर्णयाची मागणी

by Ganesh Dhanawade
July 11, 2026
in Guhagar
34 0
1
Principals' Association's statement to the Tehsildar
67
SHARES
191
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर तालुका मुख्याध्यापक संघाचे तहसीलदारांना निवेदन

गुहागर, ता. 11 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गुहागर तालुका मुख्याध्यापक संघाच्या वतीने तहसीलदार, गुहागर यांना विविध प्रलंबित प्रश्नांबाबत निवेदन सादर करण्यात आले. Principals’ Association’s statement to the Tehsildar

निवेदनात शिक्षकांवरील वाढता अशैक्षणिक कामांचा भार, टीईटी अनिवार्यता, एसआयआर (SIR) मोहीम, बीएलओची कामे तसेच इतर शासकीय जबाबदाऱ्यांमुळे अध्यापन प्रक्रियेवर विपरीत परिणाम होत असल्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले. शिक्षकांना सातत्याने अशैक्षणिक कामांमध्ये गुंतविल्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणावर परिणाम होत असल्याची भावना संघटनेने व्यक्त केली. Principals’ Association’s statement to the Tehsildar

यावेळी टीईटी अनिवार्यतेबाबत न्याय्य निर्णय घेणे, शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा भार कमी करणे, रिक्त शिक्षक पदे तातडीने भरणे, टप्पा अनुदानाचा प्रश्न मार्गी लावणे, विनाअनुदानित शाळांतील पात्र शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे तसेच मराठी व इतर अनुदानित शाळांचे अस्तित्व टिकविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. तसेच बीएलओसह इतर शासकीय कामांसाठी शिक्षकांची नियुक्ती करताना शाळांमधील अध्यापन व्यवस्था विस्कळीत होणार नाही, यासाठी पर्यायी यंत्रणा उभारण्याचीही मागणी निवेदनातून करण्यात आली. Principals’ Association’s statement to the Tehsildar

हे निवेदन तहसीलदार, गुहागर यांना सादर करण्यात आले असून शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांवर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली. यावेळी गुहागर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री. गोरिवले, श्री. राऊत, श्री. साठे, सौ. कांबळे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. Principals’ Association’s statement to the Tehsildar

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarPrincipals' Association's statement to the Tehsildarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share27SendTweet17
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.