गुहागर, ता. 27 : शहरातील श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर या शाळेचे माजी मुख्याध्यापक सुभाष कनगुटकर यांचे वरचापाट येथील राहत्या घरी निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 83 वर्षे होते. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. Principal Subhash Kangutkar is No More

सुभाष कनगुटकर हे गुहागर शहरातील प्रसिद्ध डॉक्टर शैलेश कनगुटकर यांचे वडील. सुभाष कनगुटकर यांनी श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर या शाळेत सुरुवातीला काही वर्षे पर्यवेक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली होती. त्यानंतर ते मुख्याध्यापक पदी रुजू झाले होते. मुख्याध्यापक पद त्यानी यशस्वीपणे सांभाळले. कनगुटकर यांची तब्येत सातत्याने बिघडत होती. त्यांना काही दिवसांपूर्वी अधिक उपचारासाठी मुंबई येथील रुग्णालयात देखील नेण्यात आले होते. अशातच त्यांचे शुक्रवार दिनांक 26 मे 2023 रोजी सायंकाळी ४.३० वाजता वरचापाट येथील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या अंत्ययात्रेला विविध स्तरातील मान्यवर उपस्थित होते. Principal Subhash Kangutkar is No More
