डॉ. विनय नातू , लोकसभेसाठी भाजपकडे उमेदवारांची कमतरता नाही
गुहागर, ता. 06 : पक्षाने संधी दिल्यास मी रायगड लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहे. असे प्रतिपादन करतानाच रायगड लोकसभेसाठी भाजपकडे उमेदवारांची कमतरता नसल्याचे उत्तर रत्नागिरी भाजपचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार विनय नातू यांनी सांगितले. Press conference on behalf of BJP in Guhagar
केंद्र सरकारला 9 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सुरु झालेल्या जनसंपर्क अभियानाची माहिती देण्यासाठी भाजपने गुहागरमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेदरम्यान पत्रकारांनी डॉ. विनय नातू यांना रायगड लोकसभेची निवडणुक भाजपकडून कोण लढवणार अशी विचारणा केली. त्यावेळी डॉ. नातू म्हणाले की, सध्या राजकीय वर्तुळात रायगड लोकसभेसाठी भाजपकडे उमेदवार नाही अशी जोरदार चर्चा सुरु आहे. ही चर्चा का चालली आहे , कोण करत आहे याच्या खोलात शिरण्याची गरज नाही. मात्र जे चर्चा करताना त्यांनी लक्षात घ्यावे की, भाजपकडे लोकसभा निवडणुकीसाठी पेण विधानसभेचे विद्यमान आमदार रवींद्र पाटील, गुहागरतून माजी आमदार म्हणून मी स्वतः, पेणेचे माजी आमदार धैर्यशील पाटील तर विधान परिषदेचे आमदार निरंजन डावखरे असे चार सक्षम उमेदवार आहेत. त्याच्यामुळे बाकी कुणाला जर वाटत असेल की, भाजपकडे उमेदवारच नाही तर त्यात काही तथ्य नाही. पक्ष विचारपूर्वक उमेदवार देतो. ज्येष्ठत्वाचा विचार केल्यास मी चारवेळा आमदार होतो. प्रदेश स्तरावर संघटनात्मक काम करताना काही वर्ष रायगड जिल्ह्यातही काम केले आहे. त्यामुळे पक्षाने लोकसभेसाठी विचारणा केल्यास मी खासदारकीची संधी सोडणार नाही, असे सुतोवाच डॉ. नातू यांनी केले. Press conference on behalf of BJP in Guhagar
2024 च्या विधानसभेमध्ये गुहागरची जागा शिवसेना व भाजप युतीत भाजपला मिळेल हे जवळपास नक्की झाले आहे. याची अधिकृत घोषणा झालेली नसली तरी त्यादृष्टीने भाजप कामाला लागला आहे. ही जागा भाजपला मिळाली तर येथील उमेदवार डॉ. विनय नातूच असतील असे मानले जात होते. मात्र आजच्या पत्रकार परिषदेत लोकसभेची संधी मिळाल्यास इच्छुक असल्याचे सांगून डॉ. विनय नातूंनी एक वेगळाच धक्का दिला आहे. Press conference on behalf of BJP in Guhagar
त्यांच्या या विधानामुळे लोकसभा नातू लढवणार असतील तर विधानसभेची जागा भाजप कोणाला देणार. नव्या दमाचा स्थानिक चेहरा भाजप इथे शोधणार की आमदार भास्कर जाधव यांना टक्कर देण्याची क्षमता असलेला अन्य ठिकाणचा उमेदवार इथे येणार. किंवा लोकसभा भाजपला आणि विधानसभा शिवसेनेला असे गणित राहील. अशा वेगवेगळ्या चर्चा भाजपच्या गटात सुरु झाल्या आहेत. Press conference on behalf of BJP in Guhagar