गुहागर उबाठाचे तालुकाप्रमुख सचिन बाईत यांचा पत्रकार परिषदेतून इशारा
गुहागर, ता. 22 : आ. जाधव यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने तालुक्याचा विकास झाला. १४० कि.मी. चे रस्ते जिल्हा मार्ग करुन रस्त्यांसाठी निधी मिळवला. मार्गताम्हाने ते बोऱ्या, भातगाव-राई, सावर्डे-तवसाळ रस्ता या प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण केले. ज्वलंत पाणीटंचाई निर्माण झालेल्या धोपावे, अंजनवेलसारख्या गावांचा पाणीप्रश्न सोडविला. मच्छिमारांच्या घराखालील जमिनी त्यांच्या नावे व्हाव्यात, ही प्रमुख मागणी त्यांचीच आहे. त्यामुळे आ. जाधव यांच्यावर विकासच केला नाही, असा आरोप करणाऱ्या भाजपच्या निलेश सुर्वे यांनी आपल्या पक्षाच्या कारकिर्दीत किती कामे केली हे सांगावे. यापुढे अशाप्रकारचे खोटेनाटे आरोप सहन केले जाणार नाहीत, शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, असा इशारा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख सचिन बाईत यांनी दिला. Press conference
माजी आमदार डॉ. विनय नातू यांच्यावर टीका केल्यानंतर भाजप तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांनी या टिकेचा खरपूस समाचार घेतला. सुर्वे यांच्या आरोपांना उत्तर देताना उबाठा गटाचे तालुकाप्रमुख सचिन बाईत म्हणाले, गुहागर भाजपा तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे यांनी आमदार भास्कर जाधव यांच्यावर जे आरोप केले व तालुक्यातील विकासकामांच्या प्रश्नावर दिशाभूल केली असून आमचा संताप अनावर झाला आहे. आजपर्यंत आम्ही संयमी भूमिका घेतली आहे मात्र, यापुढे त्यांच्या आरोपांना शिवसेना स्टाईलने उत्तर देणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. तसेच लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभासाठी मुख्यमंत्री रत्नागिरीत आले आहेत. त्यांच्या कार्यक्रमासाठी गुहागर आगारातील 73 बस सोडण्यात आल्या आहेत. आगारात केवळ 6 बस शिल्लक आहेत. त्यामुळे तालुक्यातील मार्गावर बस नसल्याने कर्मचारी, कामगार यांना कामावर जाता आले नाही. त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान झाले तर विध्यार्थीचे शैक्षणिक नुकसान झाले. या प्रकारचा आम्ही निषेध करतो, असे बाईत म्हणाले. Press conference


जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष महेश नाटेकर यांनी कामगार कल्याण मंडळ योजनेतून आलेले पैसे आ. जाधव यांनी वाटले व ते जनतेच्या टँक्समधूनच होते, असे म्हणणाऱ्या सुर्वे यांनी लाडकी बहीण योजनेसाठी लागणारे पैसे कुणाच्या टँक्समधून आहेत हे आम्ही विचारले का, असा सवाल करुन लाडकी बहीण योजनेच्या जीवावर गुहागरमध्ये तुम्ही निवडणूक जिंकून दाखवावी, असे आव्हान नाटेकर यांनी केले. यापुढची निवडणूकही उध्द्वव बाळासाहेब ठाकरे गटाचे जाधवच लढवून ते जिंकतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. Press conference
शिवसेनेचे जेष्ठ कार्यकर्ते विनायक मुळ्ये म्हणाले, आमसभेत ब्राम्हण समाजावर आ. जाधव यांनी टीका केली असे भाजपचे सुर्वे म्हणत आहेत, मात्र, ही टीका समाजावर केलेली नसून केवळ डाँ. विनय नातू यांच्यावर केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच आ. जाधव यांनी कोणतेही जातीपातीचे राजकारण न करता प्रत्येक समाजाच्या कार्यकर्त्याला न्याय दिला आहे. ब्राम्हण समाजाच्या व्यक्तीलासुध्दा सभापतीपासून ते नगरसेवक केले आहे. त्यामुळे असे जातीचे आरोप करणे नीलेश सुर्वे यांनी थांबवावे, जातीजातींमध्ये विनाकारण वाद लावून देऊ नये, असा सल्ला मुळ्ये यांनी देऊन ब्राम्हण समाजातर्फे निषेध व्यक्त केला. Press conference
या पत्रकार परिषदेला माजी सभापती विलास वाघे, सौ. पूर्वी निमूणकर, नेत्रा ठाकूर, इम्रान घारे, स्वप्नील भोसले, रवींद्र आंबेकर, समिती घाणेकर, राज विखारे, जयदेव मोरे, मुख्यत्यार ठाकूर आदी उपस्थित होते. Press conference