• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
17 June 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

महाराष्ट्र राज्य सह. पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ॲड.दीपक पटवर्धन

by Mayuresh Patnakar
June 13, 2026
in Maharashtra
94 1
0
President of the Federation of State Credit Institutions, Deepak Patwardhan
185
SHARES
529
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 13 : संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील पतसंस्थांची शिखर संस्था असलेल्या राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्षपदी स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्था मर्यादित रत्नागिरी जिल्हयाचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांची बिनविरोध निवड झाली. याबद्दल संपूर्ण राज्यातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत. President of the Federation of State Credit Institutions, Deepak Patwardhan

युद्धजन्य परिस्थिती इंधनाचे वाढते दर यामुळे अर्थविश्वासमोर एक आव्हानात्मक परिस्थिती उद्भवली आहे. यामुळे पतसंस्थांसमोर नवीन आव्हाने उभी राहत आहेत अशा परिस्थितीत राज्यभर १९००० पतसंस्थांना योग्य असे मार्गदर्शन व नेतृत्व  मिळाले आहे. असे उद्गार भारतीय रिझर्व बँकेचे संचालक सतीशजी मराठे यांनी यावेळी काढले व ॲड.दीपक पटवर्धन यांचे अभिनंदन केले. यावेळी पतसंस्था फेडरेशनचे मुख्य प्रवर्तक वसंतराव शिंदे, माजी अध्यक्ष काकासाहेब कोयटे, उपाध्यक्ष डॉ.शिंगी, महासचिव श्री.राजोबा सर, ज्येष्ठ संचालक श्री.दादाराव तुपकर यांचेसह पतसंस्था फेडरेशनचे राज्यभरातील सर्व संचालक उपस्थित होते. President of the Federation of State Credit Institutions, Deepak Patwardhan

राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री मा.ना.उदयजी सामंत, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा.आ.रविंद्रजी चव्हाण, आमदार किरणजी सामंत, मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष व आमदार प्रवीणजी दरेकर, सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.उदयजी जोशी, आमदार प्रसादजी लाड यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. President of the Federation of State Credit Institutions, Deepak Patwardhan

Tags: Deepak PatwardhanGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarPresident of the Federation of State Credit Institutionsटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share74SendTweet46
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.