भारतीय जनता पार्टी गुहागरतर्फे आयोजन
गुहागर, ता. 21 : भारतीय जनता पार्टी गुहागर तालुका आणि वालावलकर रूग्णालय डेरवण यांच्या संयुक्त विद्यमाने दि.20 ऑगस्टला हेदवीमध्ये शस्त्रक्रिया पूर्व तपासणी शिबीर झाले. या शिबीरात ९० रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ५४ रूग्णांना डेरवण रूग्णालय होणा-या मोफत शस्त्रक्रिया शिबीराला जाण्यासाठी सूचना करण्यात आली आहे. Pre-Surgery Checkup Camp in Hedvi

या शिबीराच्या सुरूवातीला उपस्थित वैद्यकीय पथकाचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर डेरवण रूग्णालयाचे सचिन धुमाळ यांनी शिबीरात तपासणी केल्यानंतर पुढे काय करायचे याविषयी माहिती दिली. डॉ. गुंजोटे यांनी ग्रामीण भागातील गरजू रूग्णांना याचा लाभ मिळून फायदा होणार असल्याचे सांगत आयोजक तसेच डेरवण रूग्णालयाचे आभार मानले. या शिबीरात ९० रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ५४ रूग्णांना विविध डेरवण रूग्णालय होणा-या मोफत शस्त्रक्रिया शिबीराला जाण्यासाठी सूचना करण्यात आली.तेथे पिवळ्या व केशरी रेशनकार्ड धारकांना १६ प्रकारच्या विविध आजारांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. Pre-Surgery Checkup Camp in Hedvi

यावेळी भाजपा उत्तर रत्नागिरी ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर, भाजपा गुहागर तालुका सरचिटणीस सचिन ओक, दिलिप गोखले, वेळणेश्वर माजी सरपंच संदिप ठाकूर, नाना निमकर, धनंजय पाटील, विलास नाटुस्कर, शाम विचारे, माजी सैनिक मनोहर लांजेकर, हुसेन भाई, दादू गुरव, जया सावंत आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. Pre-Surgery Checkup Camp in Hedvi
