(सकाळचे वरिष्ठ प्रतिनिधी, ज्येष्ठ पत्रकार संदीप काळे यांचा सप्तरंग पुरवणीत ‘भ्रमंती’सदरात व “यशवंत आयुष्याची ‘सारथी’ ” या शिर्षकाखाली प्रसिद्ध झालेला लेख)
प्रथमेश अरविंद राजेशिर्के हे कोकणातल्या चिपळूण तालुक्यातील मांडकी गावाचे. परिस्थिती अत्यंत हालाखीची त्यातच त्यांचे कुटुंबिय कोरोनाच्या विळख्यात अडकलेले असताना प्रथमेशही दवाखान्यामध्ये युपीएससी परीक्षेचा अभ्यास करत होता. घरीबसून युपीएससीचा अभ्यास करून परीक्षा देण्याशिवाय प्रथमेशला पर्याय नव्हता. या काळात मित्राच्या माध्यमातून “सारथी” या पुण्यामधल्या शासकीय संस्थेची माहिती प्रथमेशला मिळाली. शिक्षणासाठी मुलांचा खर्च पूर्णपणे संस्थेकडून उचलला जातो, असं समजताच प्रथमेशने “सारथी” संस्थेने आयोजित केलेली परीक्षा दिली. ती परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे, प्रथमेशला सारथीसंस्थेकडून दरमहा तेरा हजार रूपये मिळत गेले. दिल्लीच्या क्लासची संपूर्ण फी ‘सारथी’ संस्थेने भरली. सारथी संस्थेचे प्रमुख काकडेसरांचे त्याला वेळोवेळी मार्गदर्शन लाभले व त्यांनीच त्याला मेंटारशिपही दिली. युपीएससीची परीक्षा पास झाल्यानंतर, आदिवासी बांधवांची सेवा करण्याची बांधवाना लाल दिव्याच्या गाडीत बसवायची मनोमनी इच्छा असल्यामुळे प्रथमेश अरविंद राजेशिर्के यांनी आपल्या पहिल्या पोस्टिंगसाठी ओडिशाला प्रथम पसंती दिली होती. यूपीएससी पास होऊन ओडिशामध्ये उपविभागीय अधिकारीपदी रूजू झालेले प्रथमेश अरविंद राजेशिर्के हे कोकणचे सुपुत्र आहेत. Prathamesh successful with the help of SARTHI


ओळख सारथीची
मराठा, कुणबी समाजाच्या वेगवेगळ्या मागण्यासंदर्भात २०१८ मध्ये मराठा समाजाचे अनेक मोर्चे निघाले. त्यात मराठा समाजाच्या मुलांच्या शैक्षणिक विकास व्हावा, अशी मागणी होती. या मागणीतून अत्यंत बुद्धिमान, संवेदनशील दूरदृष्टी असलेल्या देवेंद्र फडणवीस या अभ्यासू अशा तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी ” सारथी” संस्थेची सुरूवात केली. मराठा, कुणबी समाजाच्या मुलांच्या भविष्य, करियर यासाठी सारथी सारखा महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट काळाची गरज बनला होता. सारथीमुळे या समाजामध्ये शिक्षणाचे प्रमाण खूप वाढलं. युपीएससी, एमपीएससी परीक्षेतील यशसंपादनामुळे सरकारी नोकरीमध्ये जाणार्या मुलांची संख्या वाढली. सारथीने प्रमाणपत्र, आर्थिक मदत, मार्गदर्शन या स्वरूपात शाबासकी दिल्यामुळे नववीपासून मुलं अभ्यासाकडे वळली.त्यांना शिष्यवृत्ती मिळू लागली. मुलांमध्ये अभ्यास करण्याची स्पर्धा लागली. जयंती,पुण्यतिथीच्या नावाखाली वर्गण्या मागणारी मुलं एमपीएससी, यूपीएससी करण्यासाठी दिल्लीला जायचे असे म्हणू लागले. दिवसेंदिवस आर्थिक अडचणीमध्ये दारिद्र्याच्या गाळामध्ये फसणार्या मराठा, कुणबी समाजातील मुलांचे ‘सारथी’मुळे अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ लागले.गेल्या चार वर्षात ‘सारथी’ने चार लाखांपेक्षा अधिक तरूणाईचे मोठे अधिकारी होण्याचे स्वप्न साकारले आहे. Prathamesh successful with the help of SARTHI
“सारथी” संस्थेच्या यशात सिंहाचा व मोलाचा वाटा व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे सरांचा(९८२२८०८६०८) आहे. नांदेडला जिल्हा परिषदेमध्ये शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमामध्ये आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवणारे आयएएस अधिकारी काकडेसरांची मुद्दाम सारथी’ संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या नावानं ‘सारथी’संस्था सुरू झाली. त्या छत्रपती शाहू महाराजांच्या नावाला साजेसं काम काकडेसरांनी व त्यांच्या सहकार्यांनी इथं उभं केलं आहे. नववीपासून ते वयाच्या चाळीस वर्षापर्यत ‘सारथी’मध्ये कितीतरी प्रकारच्या शिक्षणासाठी मदत केली जाते.अनेक व्यक्ती,अनेक संस्था अनेक सामाजिक कार्यकर्ते ‘सारथी’च्या कामांमध्ये वेळ देत आहेत.आता सारथी अजून विस्तार करत प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृह,प्रशिक्षण केंद्र यासाठी भर देत आहे. मागच्या चार वर्षात ५५१ तरूण,एममपीएससी परीक्षेत अव्वल ठरले.तर या चार वर्षामध्ये यूपीएसपीमध्ये ८४ तरूणांनी यश संपादन केले आहे. केंद्र शासनाच्या स्काॅलरशिप परीक्षेमध्ये पात्र ठरवूनही मेरीटमध्ये नंबर न लागणार्या विद्यार्थ्यांना ‘सारथी’ने हेरले आणि त्यांच्या आयुष्याचा उद्धार केला.” Prathamesh successful with the help of SARTHI