आदिम लाभार्थ्यांनी सर्व्हेक्षणासाठी उपस्थित रहावे
रत्नागिरी, ता. 22 : प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान योजनेंतर्गत घरांसाठी पात्र कुटुंबाची निवड करण्यासाठी व सर्वेक्षणाच्या वेळी लाभार्थ्यांची नोंदणी पूर्ण करण्यासाठी सर्व आदिम जमातीमधील लाभार्थ्यांनी आपल्या ग्रामपंचायत क्षेत्रातील राहत्या वस्तीच्या/घराच्या ठिकाणी होणाऱ्या सर्वेक्षणासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष कार्यकारी समिती, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे. हे सर्वेक्षण आणि नोंदणी प्रक्रीया 5 जानेवारी 2024 पर्यंत पूर्ण करणे बंधनकारक आहे. Pradhan Mantri Janjati Tribal Justice Mission


प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानांतर्गत आदिम जमातीतील पात्र कुटुंबासाठी देशात 4 लाख 90 हजार लाभार्थ्यांना मुलभूत सुविधांसह पक्की घरे बांधण्यासाठी प्रती घरकुल 2 लाख 39 हजार (घरकुल अनुदान 2 लाख रुपये, स्वच्छ भारत मिशन 12 हजार रुपये आणि मनरेगा अंतर्गत 90/95 दिवसाचे अकुशल वेतन 27 हजार रुपये) अशी तरतूद करण्यात आलेली आहे. लाभार्थी निवडीचे निकष – लाभार्थी कोलाम, कातकरी व माडीया गोंड या आदिम जमातीमधील असावा. लाभार्थ्यांकडे कुठही पक्के घर नसावे. लाभार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्य शासकीय सेवेत नसावा. Pradhan Mantri Janjati Tribal Justice Mission
तरी लाभार्थ्यांनी पंचायत समिती, चिपळूण येथे 02355-252028, पंचायत समिती दापोली येथे 02358-282082, पंचायत समिती गुहागर येथे 02359-240225, पंचायत समिती संगमेश्वर येथे 02354-260028 आणि पंचायत समिती मंडणगड येथे 02350-225228 येथे संपर्क साधावा. Pradhan Mantri Janjati Tribal Justice Mission