लाभार्थ्यांनी ई केवायसी पूर्ण करुन घ्यावी
रत्नागिरी, ता. 30 : प्रधानमंत्री जनआरोग्य गोल्डन कार्ड काढल्यानंतर प्रती कुटुंब प्रती वर्ष 5 लाखांपर्यंत मोफत उपचार अंगीकृत रूग्णांलयात मिळणार असून, जिल्ह्यातील 11 लाख 75 हजार नागरिक गोल्डन कार्डसाठी पात्र आहेत. मागील एक महिन्यात आरोग्य विभागाकडून अठ्याहत्तर हजार गोल्डन कार्डची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व उर्वरित लाभार्थ्यांनी लवकरात लवकर ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये व जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. संघमित्रा फुले गावडे, जिल्हा समन्वयक डॉ. रेणुका चौघुले यांनी केले आहे. Pradhan Mantri Janarogya Golden Card
महात्मा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजना या दोन योजनांचे एकत्रीकरण करून नागरिकांना गोल्डन कार्डचे वाटप करण्यात येत आहे. हे कार्ड असणाऱ्यांना पाच लाखांपर्यंतचे मोफत उपचार अंगीकृत रूग्णांलयात दिले जाणार आहेत. पात्र नागरिकांना त्वरेने गोल्डन कार्ड ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी श्री. सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पुजार यांनी लोकांना तातडीने आरोग्य गोल्डन कार्ड काढून देण्याबाबत सूचना केल्या. जिल्ह्यातील शासकीय आरोग्य केंद्रातील कर्मचारी, आशा स्वयंसेविका, ग्रामपंचायतींमधील डाटा एन्ट्री ऑपरेटर, तसेच अंगीकृत रूग्णांलयातील आरोग्य मित्र व आपले सरकार सेवा केंद्र यांच्यामार्फत हे कार्ड काढून देण्यात येत असल्याची माहिती डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी दिली. Pradhan Mantri Janarogya Golden Card


आपल्या भागातील शासकीय आरोग्य केंद्र, गावातील आशा स्वयंसेविका, ग्रामपंचायतीतील आपले सरकार सेवा केंद्र येथे आरोग्य योजनेचे गोल्डन कार्ड मोफत काढून दिले जात आहे. त्यामुळे नागरिकांनी या ठिकाणी संपर्क साधून आपले गोल्डन कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. शासनाद्वारे प्राप्त झालेली गोल्डन कार्ड यांचे तालुकानिहाय आशा स्वयंसेविकाद्वारे वाटप करणे चालू आहे. ज्यांची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्यांनी कार्ड मिळण्यासाठी आशा स्वयंसेविका यांच्याशी संपर्क साधावा. Pradhan Mantri Janarogya Golden Card
जिल्ह्यात 12 रुग्णालयांत मोफत उपचार
महात्मा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत समाविष्ठ असलेल्या जिल्ह्यातील 12 रुग्णालयांमध्ये गोल्डन कार्ड असणाऱ्यांना 5 लाखांपर्यंतचे उपचार मोफत दिले जाणार आहेत. जिल्ह्यातील पात्र 3 लाख 97 हजार लोकांनी मोफत उपचारासाठी गोल्डन कार्ड काढले आहे. जिल्ह्यातील एकूण 11 लाख 75 हजार नागरिकांना योजनेतून कार्ड दिले जाणार आहे. Pradhan Mantri Janarogya Golden Card
ई कार्ड प्रक्रिया
ऑपरेटरने BIS2.0 प्रणाली मध्ये आधार नंबर / फॅमिली आयडी नंबर / नाव व्दारे पात्र लाभार्थी शोधुन त्यांचे ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आहे. तसेच त्या पात्र कुटुंबामधील (नवीन लग्न झालेल्याचे नाव, नविन जन्म झालेल्या शिशूचे नाव) लाभार्थ्यांचे नाव नसेल तर त्या लाभार्थ्यास त्या कुटुंबामध्ये समाविष्ठ करुन ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आहे. BIS2.0 मध्ये ऑपरेटर व्दारे (आशा, कॉमन सर्विस सेंटर) लाभार्थ्यांचे ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शासनाने निवड केलेल्या एजन्सी व्दारे कार्ड प्रिंट करुन तालुका कार्यालयाकडे पाठविले जातील व ते कार्ड आशा व्दारे लाभार्थ्यांपर्यंत पोहचविणे आहे. स्व:त लाभार्थी देखील खाली दिलेल्या लिंक द्वारे स्वःतचे ई केवायसी बेनिफिशरी लॉगइन मधून पूर्ण करू शकतो. Pradhan Mantri Janarogya Golden Card