गुहागर, ता. 08 : जिल्हा परिषद शाळा कर्दे नं- १ शाळेची ६ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत गावात दुसऱ्यांदा प्रभात फेरी काढण्यात आली. या प्रभात फेरीद्वारे प्रत्येक वाडीत जाऊन जन जागृती करण्यात आली. विद्यार्थ्यांनी भर पावसात घोषणा देऊन परिसर दुमदुमुन टाकला. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. भालेराव मॅडम यांनी ग्रामस्थांना हर घर तिरंगा या विषयी माहिती दिली. शाळेपासून निघालेली प्रभात फेरी देऊळवाडी, गुरववाडी, व शेवटी सनगरेवाडी मध्ये जाऊन फेरीची सांगता करण्यात आली. Prabhat Feri of Karde No-1 School


यावेळी ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. सनगरेवाडीमध्ये प्रभातफेरी गेल्यावर तेथील महिलांनी सर्वांना खाऊवाटप केला. श्री. किरण आंबेकर यांनीही रिक्षाची सोय करून सहकार्य केले. अत्यंत सुंदर, उस्फूर्तपणे आणि आनंदात कार्यक्रम पार पडला. यासाठी सर्व ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. Prabhat Feri of Karde No-1 School


यावेळी शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. दिगंबर गुरव, सनगरेवाडी प्रमुख जेष्ठ कारभारी सुरेशकाका पारदळे, श्री. चेतन गुरव, श्री. सुनील गुरव व सर्व ग्रामस्थ उपस्थितीत होते. शेवटी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. Prabhat Feri of Karde No-1 School

