गुहागर, ता. 28 : गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा तवसाळ बाबरवाडीच्या वतीने शासनाच्या घरोघरी तिरंगा या अभियानाची जनजागृती करण्यात आली. यावेळी शाळेच्या चिमुकल्यांनी घोषणा देत नागरिकांना या अभियानाची माहिती दिली. Prabhat Feri at Tavasal School

राष्ट्रीयत्वाची भावना, बंधुभाव वाढावा व स्वातंत्र्यासाठी लढलेल्या स्वातंत्र्यसेनानींचा संघर्ष आजच्या पिढ्यांना अवगत व्हावा. म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा अभियान सुरू केले आहे. हे अभियान येत्या १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणार आहे. आपण सर्व या अभियानात सहभागी होऊन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करूया, असे आवाहन यावेळी ग्रामस्थांना करण्यात आले. Prabhat Feri at Tavasal School

शाळेचे मुख्याध्यापक संजय बुरटे, शिक्षक ज्ञानेश्वर कोकाटे यांनी विद्यार्थी, विद्यार्थींनी यांच्यासह ग्रामस्थ मंडळी शंकर येद्रे, मोहन येद्रे, अविनाश नाचरे, दिपक येद्रे, विजय नाचरे, अंगणवाडी सेविका सौ. अंकीता ज्ञानेश्वर, ग्रामपंचायत सदस्य वैभवी चंद्रकांत येद्रे, श्रावणी विजय नाचरे, विदया विलास येद्रे, दिपक जोशी आदींसह गावातील ग्रामस्थ यांना घेऊन परिसरातून जनजागृती रॅली काढली. Prabhat Feri at Tavasal School
