गुहागर. ता. 27 : कोकणची लोककला म्हणून प्रसिद्ध असलेला तमाशा सर्वांनाच परिचित आहे. आज तरुण पिढीने त्याला शहरी भागात रंगमंचही दिला आहे. परंतु कोणताही आर्थिक आधार नसतानाही ही कला जोपासून ठेवण्याचे काम कोकणातील कलावंत करत आहेत. असेच गुहागर शहरातील कुंभारवाडी येथील प्रभाकर तानू साळवी यांनी तमाशामध्ये डफली वादनाबरोबर विविध कला सादर करून लोककला अबाधित ठेवली आहे. Prabhakar Salvi who cultivates folk art
सांस्कृतिक कलावंत प्रभाकर तानू साळवी यांनी तमाशा कलावंत म्हणून जनमानसात आपला ठसा उमटविला आहे. सुमारे 40 वर्षे त्यांनी तमाशा या लोककलेला मोलाचे योगदान दिलेले आहे. त्यांनी तमाशा या लोककलेमध्ये गोमू, गणगौळण, वगनाट्य या क्षेत्रामध्ये आपले नाव अजरामर केले आहे. आज त्यांच्या वयाला 68 वर्षे पूर्ण होत आहेत. आजही ते तमाशामध्ये विविध कला दाखवून लोककलेला प्रोत्साहन देत आहेत. Prabhakar Salvi who cultivates folk art