पूर्वीच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती
गुहागर, ता. 16 : तालुक्यातील गिमवी गावातील मुख्य रस्त्यावरून जाणाऱ्या विद्युत वाहिन्यांची अवस्था सध्या चिंताजनक बनली आहे. दोन विद्युत खांबांमधील अंतरावरून जाणाऱ्या वीजवाहिन्या मोठ्या प्रमाणात खाली झुकल्या असून, काही ठिकाणी तारांची स्थितीही खराब झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या मार्गावरून होणाऱ्या वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. Power lines in Gimavi village are dangerous
गिमवी गावातील हा मुख्य रस्ता असून, या मार्गावरून एसटी बसेससह अन्य मोठ्या वाहनांची नियमित ये-जा सुरू असते. मात्र, रस्त्याच्या वरून जाणाऱ्या विद्युत वाहिन्यांचा झोळ वाढल्याने मोठ्या वाहनांना त्याचा धोका निर्माण होऊ शकतो. काही विद्युत तारांना आवश्यक संरक्षण कवच नसल्याचेही दिसून येत आहे. तर काही ठिकाणी विद्युतप्रवाह सुरू असलेल्या तारा जीर्ण अवस्थेत असून, त्या तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. Power lines in Gimavi village are dangerous