• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
2 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आरजीपीपीएल मधून ७०० मेगावॉट वीजनिर्मिती सुरू

by Ganesh Dhanawade
April 20, 2023
in Guhagar
189 2
2
Power generation started from RGPPL

आरजीपीपीएल प्रकल्प

372
SHARES
1.1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

केवळ तीन दिवस चालणार वीजनिर्मिती; प्रकल्पाचे भवितव्य अंधारमय

गुहागर, ता. 20 : गॅसच्या वाढलेल्या किंमती आणि वीजेची मागणी नसल्याने बंद पडलेला गुहागर तालुक्यातील रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्प (RGPPL) (आधीचा दाभोळ) पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. परंतु, राज्य किंवा केंद्र सरकारकडून अद्यापही म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. दरम्यान, येथील प्रकल्प व्यवस्थापन विजेच्या मागणी नुसार वीज निर्मिती करत आहे. सोमवारपासून प्रकल्पातून ७०० मेगावॉट वीजनिर्मिती सुरू केली आहे. ही वीज निर्मिती तीन दिवस चालणार आहे.  Power generation started from RGPPL

तालुक्यातील अंजनवेल याठिकाणी उभारण्यात आलेला एन्रॉनचा दाभोळ वीज प्रकल्प आणि आताचा रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्प १९९५ साली सत्तेवर आलेल्या शिवसेना-भाजप युतीच्या काळात वादग्रस्त ठरला होता. सध्या एनटीपीसी या कंपनीतील प्रमुख भागधारक आहे, तर राज्य वीज कंपनीचे भागभांडवल खूपच कमी आहे. गॅसवर चालणारा हा प्रकल्प देशातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. किफायतशीर दराने अखंडित गॅस पुरवठा झाल्यास या प्रकल्पातून कमी दराने वीजनिर्मिती होऊ शकते. त्यासाठीच केंद्राकडे पाठपुरावा करणे आवश्यक आहे. एकीकडे विजेची वाढती मागणी आणि दुसरीकडे कोळशाचा तुटवडा लक्षात घेता नैसर्गिक वायूवरील हा प्रकल्प सुरू करणे योग्य राहील, असे केंद्रीय ऊर्जा विभागाचेही मत आहे. याबाबत केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंग यांच्या अध्यक्षतेखाली देशातील गॅस आधारित वीज प्रकल्पांशी संबंधित एक बैठकही काही महिन्यांपूर्वी पार पडली होती. Power generation started from RGPPL

वीज दरवाढीमुळे तत्कालीन फडणवीस सरकारने प्रकल्पातून वीज घेणे बंद केले होते. त्यानंतर कंपनीने रेल्वेबरोबर ५०० मेगावॉटचा करार करून प्रकल्प सुरू ठेवला. सरकारने नैसर्गिक वायूवरील अनुदान बंद केल्याने वीजनिर्मिती महागडी झाली. परिणामी रेल्वेबरोबरचा करारही संपुष्टात आला. महागड्या दरामुळे नवीन वीज खरेदी करार झाला नाही. भाजप-शिवसेना युतीच्या काळात एन्रॉनच्या नावाने वादग्रस्त ठरलेला या प्रकल्पात आतापर्यंत अनेक विघ्ने आली आहेत. आधी दाभोळ वीज प्रकल्प हे नाव असलेला हा प्रकल्प आता रत्नागिरी वीज प्रकल्प नावाने ओळखला जातो. Power generation started from RGPPL

दरम्यान, ऑगस्ट २०२२ पासून प्रकल्पातून एकही युनिट वीज निर्मिती होत नाही. मध्यंतरीच्या काळात व्यवस्थापनाने दोन दिवस वीज निर्मिती करत ५०० मेगावॉट वीजनिर्मिती केली होती. सोमवारी प्रकल्पातील गॅस व स्टीम टरबाईन मधून ७०० मेगावॉट वीजनिर्मिती करण्यात आली. Power generation started from RGPPL

Tags: Energy Minister R. K. SinghEnron power plantFadnavis GovtGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarPower generation started from RGPPLRgpplUpdates of Guhagarऊर्जामंत्री आर. के. सिंगएनटीपीसीएन्रॉन वीज प्रकल्पगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्याफडणवीस सरकारभाजपमराठी बातम्यालोकल न्युजशिवसेना
Share149SendTweet93
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.