प्रशांत दैठणकर, जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी
प्रगतीसाठी लागणाऱ्या मुलभूत बाबी विचारात घेतल्या तर त्यात पाणी सर्वप्रथम स्थानी आहे. औद्योगिक विकासासाठी आपणास पाणी, जागा, मुनष्यबळ यांच्या सोबतच सर्वाधिक आवश्यकता असते ती विजेची. शहरी क्षेत्रात निवासी भागात जशी विजेची आवश्चकता आहे. तशीच ती औद्योगिक क्षेत्रात देखील आहे. power@२०४७


ग्रामीण भागात देखील विजेची आवश्यकता अधिक आहे. कृषी वर आधारित अर्थव्यवस्था बळकट करायच असेल तर यांत्रिकीकरणासोबतच वीज येथेही अनिवार्य आहे. मात्र ग्रामीण भागात अद्यापही वीज पुरवठा अखंड नाही, ही स्थिती आहे. अनेक घरात वर्षानुवर्षे वीज नाही अशी स्थिती गेल्या वर्षापूर्वी होती आणि यासाठीच power@२०४७ हा महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेण्यात आला. power@२०४७
देशाच्या उन्नती अर्थात प्रगतीचा आधार म्हणून वीज निर्मिती आणि वीज पुरवठा कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे. उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य हे उद्दीष्ट ठेवून एकच वेळी विविध पध्दतीने ऊर्जा क्षेत्रात विकासाचे काम सुरु करण्यात आले. वीज निर्मितीत सर्वच क्षेत्रांचा सहभाग घेण्यात येत आहे. power@२०४७
ऊर्जा निर्मिती व वितरण यासाठी देशपातळीवर झालेल्या कामांचे फलीत आता समोर आले आहे. आपल्या देशाची कमाल मागणी 1 लाख 85 हजार मेगावॅट इतकी राहीलेली आहे. 2014 साली आपल्या देशातील ऊर्जा निर्मितीची एकूण स्थापित क्षमता 2 लाख 48 हजार 554 मेगावॅट इतकी होती. आता ती 4 लाख मेगावॅट पर्यंत वाढली आहे. आपण ऊर्जा निर्मितीत केलेल्या या प्रगतीमुळे देशातले विद्युतीकरण वाढविण्यासोबतच आता विजेची निर्यातदार झालो आहोत आणि आता शेजारील देशांना वीज पुरवत आहोत. power@२०४७
या वीज निर्मिती सोबतच स्वातंत्र्याच्या प्राप्तीनंतरही गावे-पाडयांमध्ये अंधार होता. त्यासाठी सौभाग्य योजना सुरु करण्यात आली. गेल्या 18 महिन्यांच्या कालावधीत देशातील 2 कोटी 86 कुटुंबाचे घर आपण वीज पुरवठ्याने उजळले. ही जगातील सर्वात मोठी विद्युतीकरण मोहिम ठरली. घरांसोबतच वाडया-पाडयांवरील नागरिकांचे चेहरेही या विद्युतीकरण योजनेमुळे उजळले असे म्हणावे लागेल. power@२०४७
गेल्या 5 वर्षात देशात 2,01,722 कोटी खर्च करुन साध्य विद्युतीकरणात खालीलप्रमाणे कामे करण्यात आली.
१) 2921 नवीन उपकेंद्र
२) 3926 उपकेंद्रांची श्रेणी वाढविली
३) 6,04,465 सर्कीट किमी कमी दाब तारांचे जाळे
४) 2,68,838 सर्कीट किमी उच्च दाब वाहिन्यांचे जाळ
५) 1,22,123 सर्कीट किलोमीटर कृषी फिडर उभारणी
६) 7,31,961 नवीन ट्रान्सफार्मर्स उभारणी
या सर्व उभारणी मुळे ग्रामीण भागात विजेची उपलब्धता आता 22.5 तास/दिवस इतकी वाढली 2015 साली ही सरासरी उपलब्ध 12.5 तास इतकीच होती. power@२०४७


उद्योग तसेच कृषी साठी ऊर्जा आवश्यक आहे. तितकीच ती नागरिकांसाठी आहे. या विकास कामांमुळे आपण ऊर्जा निर्मितीत केवळ स्वयंपूर्णच झालो नाही तर जागतिक स्तरावर आपली वेगळी प्रतिमा निर्माण करण्यात यशस्वी ठरलो आहोत. वीज ही विकासाची वाहिनी मानून हे कार्य याही पुढे अव्याहतपणे चालणार हे निश्चित. power@२०४७