गुहागर, ता. 21 : रत्नागिरी जिल्हा कुंभार समाज युवा आघाडी तर्फे कुंभार समाज प्रिमियर लिग क्रिकेट स्पर्धा उद्यापासून दि. 22, 23 व 24 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धा चिपळूण येथील पवनतलाव मैदान येथे खेळविण्यात येणार आहेत. तरी स्पर्धेसाठी उपस्थित राहून स्पर्धेचा उत्साह व शोधा वाढवावी, अशी विनंती करण्यात आली आहे. Potters’ Society Cricket Tournament
या स्पर्धा युवा जिल्हाध्यक्ष श्री. महेश पडवेकर, युवा जिल्हा कार्याध्यक्ष श्री. पंढरीनाथ मायशेट्ये, युवा जिल्हा सचिव श्री.सुधीर जामसूतकर, खजिनदार श्री. प्रतिक साळवी व श्री संत गोरा कुंभार युवा आघाडी रत्नागिरी व सर्व संचालक यांच्या सहकार्याने भरविण्यात आल्या आहेत. Potters’ Society Cricket Tournament