जयंत कयाळ, अभियांत्रिकी महाविद्यालयाने दरवर्षी अशी स्पर्धा घ्यावी
गुहागर, ता. 05 : रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी शहरातील विद्यार्थ्यांना लाजवतील अशा नाविन्यपूर्ण, कल्पक प्रकल्प बनविले. तसेच महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाने ही अभिनव स्पर्धा यशस्वी केली. जिल्ह्यात असे काम सातत्याने झाले तर अनेक संशोधक, शास्त्रज्ञ तयार होतील. अशी प्रतिक्रिया भाभा अणुसंशोधन केंद्रातील निवृत्त शास्त्रज्ञ जयंत कयाळ यांनी व्यक्त केली. Potential of students in Ratnagiri to become scientists
वेळणेश्र्वरमधील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाने (Maharishi Parashuram College of Engineering) रत्नागिरी जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयात शास्त्र शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रकल्प 2023 ही अभिनव स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेच्या बक्षिस वितरण समारंभानंतर भाभा अणुसंशोधन केंद्रातील 14 निवृत्त शास्त्रज्ञांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांनी भाभा अणुसंशोधन केंद्र, इस्रो आदी संस्थांमध्ये रोजगाराच्या संधी मिळते, वाढत्या इलेक्ट्रॉनिक्स कचऱ्याची विल्हेवाट कशी लावली जाते, आयटी क्षेत्राची उपयुक्तता, असे विविध प्रश्र्न विचारले. या सर्व प्रश्र्नांना अत्यंत सोप्या भाषेत उत्तरे शास्त्रज्ञांनी दिली. ई कचरा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, संशोधनाची उपयोगिता आदी विषयांची विस्तृत माहिती दिली. Potential of students in Ratnagiri to become scientists
संवाद सत्राचा समोरोप करताना जयंत कयाळ म्हणाले की, प्रकल्प 2023 या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रकल्पांनी आम्ही सर्वजण चकीत झालो. नाविन्यपूर्ण, कल्पकतेने भरलेल्या प्रकल्प 2023 या अभिनव स्पर्धेच्या प्राथमिक फेरीमध्ये 500 हून अधिक विद्यार्थी सहभागी होतात. ही गोष्ट ही कौतुकास्पद आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागापर्यंत ज्ञान आणि विज्ञान पोचविण्याचे काम शिक्षक किती तन्मयतेने करतात याचे हे उदाहरण आहे. शहरी भागातील विद्यार्थ्यांपेक्षा अधिक बुध्दीमत्ता आणि सुविधा नसताही ध्येय गाठण्याची आकांक्षा येथील विद्यार्थ्यांमध्ये आहे. हे सर्व गुण महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाने घेतलेल्या स्पर्धेमुळे समोर आले आहेत. अशा स्पर्धेचे नियोजन करणे, स्पर्धेत आपल्याला नेमके काय हवे आहे ते सर्व ग्रामिण भागातील शिक्षक आणि मुलांपर्यंत पोचविणे हे मेहनतीचे काम होते. या सर्व गोष्टीत महाविद्यालय यशस्वी झाले म्हणूनच आज विज्ञान कौशल्यांचे प्रकटीकरण ही मुले करु शकली. अशी स्पर्धा यापुढे सातत्याने महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाने घ्यावी. असे आवाहन यावेळी कयाळ यांनी केले. Potential of students in Ratnagiri to become scientists
स्पर्धेत सहभागी कनिष्ठ महाविद्यालये, शास्त्रज्ञ यांचे आभार मानताना महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र सोनी यांनी दरवर्षी आमचे महाविद्यालय अशी स्पर्धा आयोजित करेल असे जाहीर केले. त्यावेळी उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाटात महाविद्यालयाला धन्यवाद दिले. Potential of students in Ratnagiri to become scientists