• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

१८ डिसेंबर रोजी मुंबईत डाक अदालत

by Manoj Bavdhankar
December 3, 2024
in Bharat
120 2
0
Postal Court in Mumbai
236
SHARES
675
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 03 : मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई यांच्यामार्फत १८ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता पाचवा मजला, जी.पी.ओ. इमारत, मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई येथे १२९ व्या डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. Postal Court in Mumbai

महाराष्ट्र आणि गोवा राज्याशी संबंधित पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालतीमध्ये दखल घेतली जाईल. विशेषत: टपाल वस्तु/मनीऑर्डर/बचत बँक खाते/प्रमाणपत्र इत्यादीबाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा. उदा. तारीख व ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठवली असेल त्याचे नाव, हुद्दा इत्यादी. Postal Court in Mumbai

तरी संबंधितांनी आपली तक्रारी सहाय्यक निदेशक डाकसेवा (ज.शि.) आणि सचिव, डाक अदालत, मुख्य पोस्टमास्तर जनरल यांचे कार्यालय, मुंबई जी.पी.ओ. इमारत, चौथा माळा, मुंबई 400001  यांच्या नावे दोन प्रतीसह १० डिसेंबर २०२४ पर्यंत अथवा तत्पूर्वी पोहोचेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही, असे मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई यांनी कळविले आहे. Postal Court in Mumbai

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarPostal Court in MumbaiUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share94SendTweet59
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.