• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 July 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

हेदवीत उपसभापती निलेश सुर्वे यांच्या उपस्थितीत पोलिओ डोस

by Mayuresh Patnakar
June 30, 2026
in Guhagar
342 4
0
Polio dose in the presence of Nilesh Surve
672
SHARES
1.9k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 30 : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेनिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र हेदवी येथे गुहागर तालुका पंचायत समितीचे उपसभापती निलेश विश्वनाथ सुर्वे यांच्या प्रमुख उपस्थितीत लाभार्थी बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस पाजण्यात आला. Polio dose in the presence of Nilesh Surve

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना भारत पोलिओमुक्त असला तरी काही देशांमध्ये अजूनही पोलिओचे अस्तित्व असल्याने त्याचा धोका टाळण्यासाठी शासनाकडून दरवर्षी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येते, अशी माहिती देण्यात आली. बालकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी ही मोहीम अत्यंत महत्त्वाची असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. Polio dose in the presence of Nilesh Surve

या मोहिमेअंतर्गत राज्यभर २८ जून रोजी आरोग्य विभागाच्या वतीने पोलिओ डोस देण्याचे आयोजन करण्यात आले होते. रत्नागिरी जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या नियोजनानुसार गुहागर तालुक्यातही ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली. Polio dose in the presence of Nilesh Surve

यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र हेदवीचे सहाय्यक डॉ. कौशल्य वेल्हाळ, परिचारिका शेलार मॅडम, आशा सेविका सौ. रवीना मोहित, लाभार्थी बालके तसेच त्यांचे पालक उपस्थित होते. कार्यक्रमास उपसभापती निलेश विश्वनाथ सुर्वे यांनी उपस्थिती लावल्याबद्दल प्राथमिक आरोग्य केंद्र हेदवीच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले. Polio dose in the presence of Nilesh Surve

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarPolio dose in the presence of Nilesh Surveटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share269SendTweet168
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.