• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 July 2026, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पोलीस उपनिरीक्षक शरद घाग यांचा सेवापूर्ती गौरव

by Manoj Bavdhankar
July 9, 2026
in Guhagar
60 1
0
Police Sub-Inspector Sharad Ghag's glory
119
SHARES
339
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 09 : जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शरद शिवराम घाग हे तब्बल 35 वर्षे 2 महिन्यांची कर्तव्यनिष्ठ सेवा पूर्ण करून पोलीस दलातून निवृत्त झाले. त्यांच्या प्रदीर्घ व उल्लेखनीय सेवेबद्दल रत्नागिरीचे नितीन बगाटे यांच्या हस्ते श्री. घाग  यांचा सहपत्नीक सत्कार करून गौरव करण्यात आला. Police Sub-Inspector Sharad Ghag’s glory

शरद घाग यांनी 1991 मध्ये गुहागर पोलीस स्थानकातून पोलीस सेवेला प्रारंभ केला. त्यानंतर संगमेश्वर, चिपळूण, हातखंबा वाहतूक केंद्र, सागरी सुरक्षा विभाग, पोलीस मुख्यालय येथे विविध जबाबदार्‍या यशस्वीपणे पार पाडल्या. कर्तव्यदक्ष, प्रामाणिक आणि शिस्तप्रिय कर्मचारी म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. सेवाकाळात त्यांनी अनेक गुन्ह्यांच्या तपासात मोलाची भूमिका बजावली तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उल्लेखनीय योगदान दिले. त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत त्यांना पोलीस उपनिरीक्षकपदी बढती मिळाली. त्यानंतर त्यांनी सिंधुदुर्ग येथील ओरस तसेच रत्नागिरी जिल्हा वाहतूक शाखेत पोलीस उपनिरीक्षक म्हणून प्रभावीपणे काम केले. Police Sub-Inspector Sharad Ghag’s glory

नागरिकाभिमुख पोलीसिंग, कर्तव्यनिष्ठा आणि सेवाभाव या मूल्यांना जपत त्यांनी संपूर्ण सेवाकाळात जनतेचा विश्वास संपादन केला.  जिल्हा वाहतूक शाखेतर्फेही श्री. शरद घाग यांना सन्मानपुर्वक निरोप देण्यात आला. त्यांच्या निवृत्तीप्रसंगी  कुटुंबीय, नातेवाईक, सहकारी अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. Police Sub-Inspector Sharad Ghag’s glory

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarPolice Sub-Inspector Sharad Ghag's gloryटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share48SendTweet30
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.