• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागरच्या पर्यटनाला पोलिसांचे सुरक्षा कवच

by Ganesh Dhanawade
April 3, 2025
in Guhagar
85 1
2
Police security cover for Guhagar tourism
166
SHARES
475
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

समुद्रकिनारी सी प्रहरी इलेक्ट्रिक सायकलची गस्त

गुहागर, ता. 03 : कोकणातील केंद्रबिंदू म्हणून विकसित होतं असलेल्या गुहागरात दरवर्षी हजारोच्या संख्येने पर्यटक येतं असतात. सहा किलोमीटरचा विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभलेल्या अशा गुहागर समुद्रकिनाऱ्यावर आत्ता सी प्रहरी इलेक्ट्रिक सायकलची गस्त सुरू राहणार आहे. यामुळे गुहागरच्या पर्यटनाला गुहागर पोलिसांचे सुरक्षा कवच मिळणार आहे. Police security cover for Guhagar tourism

गुहागर समुद्रकिनाऱ्यावर नगरपंचायतीच्या वतीने सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहेत. त्याचबरोबर बंदर विभागाच्या वतीने दोन सुरक्षारक्षक आहेत. या सुरक्षारक्षकांबरोबर गुहागर पोलिसांचेही समुद्रकिनारी फेरफटका मारून सुरक्षेविषयी सर्वाधिक लक्ष आहे. शहराला तब्बल सहा किलोमीटरचा विस्तीर्ण स्वच्छ व सुंदर समुद्रकिनारा लाभला आहे. या किनाऱ्यावर अधिक सक्षमतेने लक्ष ठेवण्यासाठी तसेच समुद्रकिनारी येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षा देण्याचे कामही सुरक्षारक्षक व पोलीस यंत्रणा करत आहे. मात्र गुहागर पोलीस ठाण्याकरता आलेले सी प्रहरी इलेक्ट्रिक सायकलिंग मुळे समुद्रकिनाऱ्याची सुरक्षा अधिक भक्कम झाली आहे. Police security cover for Guhagar tourism

मुख्यमंत्री यांच्या सात कलमी कार्यक्रमाच्या अनुषंगाने रत्नागिरी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून शहराच्या समुद्रकिनारी गस्ती करता दोन इलेक्ट्रिक सायकल गुहागर पोलीस ठाण्यात प्राप्त झाले आहेत. या सायकल पूर्ण समुद्राच्या वाळू मधून सहज फिरू शकतात. यामुळे पोलिसांची समुद्रकिनाऱ्यावरील गस्त अधिक व्यापक बनले आहे. कोणतीही आघडीत घटना घडल्यास तातडीने सहा किलोमीटरच्या या समुद्रकिनाऱ्यावर पोलीस सहज पोहोचू शकतात. Police security cover for Guhagar tourism

गुहागरचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांनी समुद्रकिनाऱ्यावरील सुरक्षेसाठी या इलेक्ट्रिक सायकलची गस्त सुरू ठेवली आहे. महिला पोलीस कर्मचारी मार्फत कायम समुद्रकिनारी गस्त सुरू आहे. दररोज सुरू असलेले या गस्तीबाबत रत्नागिरी कार्यालयामध्ये याची नोंद होते. Police security cover for Guhagar tourism

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarPolice security cover for Guhagar tourismUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share66SendTweet42
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.