न्यायालयीन चौकशीचा धक्कादायक अहवाल समोर
मुंबई, ता. 20 : बदलापुरातील दोन शाळकरी मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणात ५ पोलिसांना जबाबदार ठरवण्यात आले आहे. न्यायालयीन चौकशीचा अहवाल आज मुंबई हायकोर्टात सादर करण्यात आला. या अहवालामध्ये अक्षयच्या हत्येला पोलीसच जबाबदार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे न्यायालयीन चौकशी समितीच्या अहवालावरुन आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. Police are responsible for Akshay’s encounter
न्यायालयीन चौकशी समतीच्या अहवालामध्ये अक्षय शिंदेच्या मृत्यूला ५ पोलिसांनाच जबाबदार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे ५ पोलिसांविरोधात फौजदारी खटला लावला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला हे पोलिसांच म्हणण पटणार नाही. हे संशयास्पद आहे, असं न्यायालयीन चौकशीच्या अहवालात म्हटलं आहे. कायद्यानुसार योग्य ती कारवाई करू अशी सरकारी वकिलांनी कोर्टात माहिती दिली. ही बनावट चकमक आहे असं आमच म्हणणं होतं. त्यासाठी गुन्हा दाखल करावा. न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास व्हावा, अशी आमची मागणी होती, असं अक्षय शिंदेच्या आई-वडिलांच्या वतीने खटला लढणाऱ्या वकिलाने सांगितलं. ही बनावट चकमक असून एकप्रकरची हत्या आहे हे मॅजिस्ट्रेटच्या अहवालातून समोर आलं आहे. Police are responsible for Akshay’s encounter