गुहागर, ता. 27 : भारत देशाचे दिवंगत पंतप्रधान, भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते, भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांची 99 वी जयंती भारतीय जनता पार्टी गुहागर कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. PM Vajpayee birth anniversary celebrated at BJP office


भारतीय जनता पार्टी गुहागर कार्यालयात भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, माजी तालुकाध्यक्ष, पंचायत राज व ग्रामविकास सेलचे उत्तर रत्नागिरी जिल्हा संयोजक यशवंत बाईत यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून स्वर्गीय अटलजींना अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस विठ्ठल भालेकर, बेटी बचाव बेटी पढावच्या भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा संयोजिका सौ. ज्योती परचुरे, भाजपा गुहागर तालुका सरचिटणीस सचिन ओक, पदवीधर जिल्हा संयोजक श्रीकांत महाजन, अल्पसंख्याक आघाडी गुहागर प्रमुख आसीफ दळवी, गुहागर शहराध्यक्ष नरेश पवार, जेष्ठ कार्यकर्ते गजानन वेल्हाळ, संजय मालप, ओबीसी आघाडी गुहागर संयोजक साईनाथ कळझुणकर, अमित जोशी, संतोष सांगळे आदी उपस्थित होते. PM Vajpayee birth anniversary celebrated at BJP office