गुहागर, ता. 16 : महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने रविवार दि.17 सप्टेंबर रोजी रानवी येथे सकाळी 7 ते 8 या वेळेत पीएम स्कील रन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत तालुक्यातील 16 वर्षावरील मुले, मुली व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयटीआय गुहागर यांच्यावतीने करण्यात आले आहे. PM Skill Run Marathon Competition at Ranvi

ही स्पर्धा पुरुष व महिला अशा दोन गटात होणार आहे. स्पर्धेतील प्रथम क्रमांकास 3000 रुपये, द्वितीय क्रमांकास 2000 रू. व तृतीय क्रमांकास 1000 रू. देवून गौरविण्यात येणार आहे. तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना डिजिटल प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभाग घेणाऱ्यानी QR code scan करून माहिती भरावी. ज्यानां QR code scan माहिती भरणे शक्य होणार नाही, त्यांची माहिती आयटीआय गुहागर याठिकाणी भरली जाईल. अधिक माहितीसाठी आयटीआय गुहागरचे प्राचार्य व प्राध्यापक यांच्याशी संपर्क साधावा. PM Skill Run Marathon Competition at Ranvi

तरी मोठ्या संख्येने मुले, मुली व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयटीआय गुहागर यांच्यावतीने करण्यात आले आहे. PM Skill Run Marathon Competition at Ranvi
