• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
11 May 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

देशासाठी जगणे हीच खरी देशभक्ती

by Mayuresh Patnakar
May 11, 2026
in Bharat
20 0
0
PM Modi's Speech in Hyderabad

PM Modi's Speech in Hyderabad

39
SHARES
110
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पंतप्रधान नरेंद्र मोदी : देशाचे परकिय चलन वाचवा

PM Modi’s Speech in Hyderabad : जेव्हा पुरवठा साखळी सतत संकटात असते, तेव्हा कितीही उपाययोजना केल्या तरी अडचणी वाढतच जातात. त्यामुळे, देश आणि भारतमातेला सर्वोच्च स्थानी ठेवून आपण आता एकजुटीने लढा दिला पाहिजे. देशभक्ती म्हणजे केवळ देशासाठी प्राण देणे नव्हे. देशासाठी जगणे आणि आपली कर्तव्ये पार पाडणे ही सुद्धा देशभक्तीच आहे. जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी देशवासियांना बचतीचे आवाहन केले. ते हैदराबादमधील जाहीर सभेत बोलत होते.  

PM Modi’s Speech in Hyderabad

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० मे २०२६ रोजी तेलंगणातील हैदराबाद येथे सुमारे ९,४०० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. (यावेळी पश्चिम आशियात अमेरिका आणि इस्रायलने इराण विरोधात सुरू केलेल्या युद्धामुळे तसेच मागील दोन वर्षांपासून सुरू असलेल्या रशिया – युक्रेन लढाईमुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाले आहेत.) या पार्श्र्वभुमीवर देशवासीयांना उद्देशून बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi’s Speech in Hyderabad) म्हणाले की, जेव्हा पुरवठा साखळी सतत संकटात असते, तेव्हा कितीही उपाययोजना केल्या तरी अडचणी वाढतच जातात. त्यामुळे, देश आणि भारतमातेला सर्वोच्च स्थानी ठेवून आपण आता एकजुटीने लढा दिला पाहिजे. देशासाठी जगणे आणि आपली कर्तव्ये पार पाडणे ही सुद्धा देशभक्तीच आहे. असे सांगत मोदीजींनी देशवासीयांना 5 महत्त्वाच्या मुद्द्यांवर आवाहन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेले 5 मुद्दे

Avoid buying Gold
पूर्वी जेव्हा देशावर संकट यायचे, तेव्हा लोक आपले सोने दान करायचे. आज मी तुम्हाला दान मागत नाही, पण देशाचे परकीय चलन (Foreign Currency) वाचवण्यासाठी पुढील वर्षभर घरात कोणतेही कार्यक्रम असले तरी सोने खरेदी करू (Avoid buying gold) नका. देशहितासाठी पुढील एक वर्ष सोने खरेदी टाळा, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी नागरिकांना केले. PM Modi’s Speech in Hyderabad

Save Oil
भारताकडे इंधनाच्या मोठ्या विहिरी नाहीत. आपल्याला पेट्रोल आणि डिझेलसाठी इतर देशांवर अवलंबून राहावे लागते. युद्धामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. अशा स्थितीत देशाला इंधन आणि खतांची आयात करण्यासाठी मोठ्या प्रमाणात परकीय चलनाची ((Foreign Currency)) गरज लागते. त्यामुळे पेट्रोल डिझेल वाचवा. (Save Oil) त्यासाठी वाहनांचा अनावश्यक वापर कमी करा, मेट्रोने, सार्वजनिक वहातुकीचा वापर करून (एस.टी., रेल्वे आदी)  प्रवास करा आणि कारपूलिंग करा. या मार्गांवर शक्य तितक्या जास्त लोकांना घेऊन प्रवास करा. अनावश्यक प्रवास टाळा, डिजिटल कामाला प्राधान्य द्या. शक्य असल्यास वर्क फ्रॉम होम करा; असेही आवाहन पंतप्रधान मोदी यांनी नागरिकांना केले आहे. PM Modi’s Speech in Hyderabad

Reduce the use of Cooking Oil
जर प्रत्येक कुटुंबाने खाद्यतेलाचा वापर कमी केला, तर परकीय चलन (Foreign Currency) वाचेल आणि लोकांचे आरोग्य सुधारेल. PM Modi’s Speech in Hyderabad.
कोणत्या खाद्य तेलांची आयात करावी लागते ?
(खालील मजकुर पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या भाषणातील नाही. तरीही खाद्य तेलाच्या आयाती संदर्भातील माहिती आपल्याला व्हावी म्हणून देत आहोत.)
आपल्याकडे सर्वाधिक प्रमाणात शेंगदाणा तेल खोबरेल तेल वापरले जाते. हे तेल आपल्याच देशात तयार होते. तरीदेखील भारत हा जगातील सर्वात मोठ्या खाद्य तेल आयातदार देशांपैकी एक आहे. देशातील एकूण खाद्य तेल (Cooking Oil) गरजेपैकी सुमारे 55-60% गरज आयातीवर अवलंबून आहे.
भारतात मुख्यतः खालील प्रकारचे खाद्य तेल (Edible Oils) आयात केले जाते:
पाम तेल (Palm Oil) हे सर्वाधिक आयात होणारे खाद्य तेल असून इंडोनेशिया आणि मलेशिया येथून मोठ्या प्रमाणावर आयात यामध्ये क्रूड पाम ऑइल (CPO), पामोलीन तेल (RBD Palmolein) या तेलाची आयात सर्वाधिक आहे. हे तेल बिस्किट, स्नॅक्स, मिठाई, हॉटेल उद्योग आणि घरगुती वापरात मोठा वापरले जाते.
सोयाबीन तेल (Soybean Oil) : भारतात स्वयंपाकासाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे हे तेल अर्जेंटिना आणि ब्राझील येथून आयात करावे लागते. अलीकडच्या काळात याच्या आयातीत वाढ झाली आहे.
सूर्यमुखी तेल (Sunflower Oil) : हलके आणि आरोग्यदायी तेल म्हणून लोकप्रिय असलेले हे तेल रशिया, युक्रेन येथून मुख्यत: आयात केले जाते.
मोहरी तेल (Mustard Oil) : भारतात मोठ्या प्रमाणात उत्पादन होते, त्यामुळे आयात कमी आहे. तरी देखील काही प्रमाणात मिश्रित किंवा प्रक्रिया केलेले तेल आयात होते.
ऑलिव्ह तेल (Olive Oil) : हे तेल प्रामुख्याने उच्चवर्गीय आणि हेल्थ-कॉन्शस ग्राहक वापरतात. ते स्पेन, इटली येथून आयात केले जाते.
कॅनोला / रेपसीड तेल (Canola/Rapeseed Oil) : आरोग्य क्षेत्रात वापरल्या जाणाऱे हे तेल मर्यादित प्रमाणात आयात करावे लागते.

    Avoid the use of Chemical Fertilizers
    देशाने रासायनिक खतांचा (chemical fertilizers) वापर निम्म्याने कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवून वेगाने नैसर्गिक शेतीकडे वळले पाहिजे. जगात खतांच्या एका गोणीची किंमत सुमारे ३ हजार रुपये असताना, केंद्र सरकार भारतीय शेतकऱ्यांना ती केवळ ३०० रुपयांत उपलब्ध करून देत आहे. रासायनिक खतांचा वापर कमी केला तर परकिय चलन (Foreign Currency) वाचेल. सेंद्रीय शेतीमुळे शुध्द धान्य देशात पिकेल. त्याचा आरोग्यावर सकारात्मक परिणाम होईल. PM Modi’s Speech in Hyderabad

    Avoid international travel
    जागतिक परिस्थिती आणि महागड्या इंधनामुळे भारत वाढत्या आर्थिक दबावाचा सामना करत आहे. त्यामुळे, लग्न, सुट्ट्या आणि इतर कारणांसाठीचा परदेश प्रवास काही काळासाठी टाळा. त्यातूनही आपले परकीय चलन (Foreign Currency) वाचेल. पर्यटनासाठी देशातील पर्यटन (Tourism) स्थळांवर फिरायला जा. स्वदेश भ्रमणातून आपण देशाच्या विकासाला हातभार लावावा. हे राष्ट्रहिताचे ठरेल. असेही आवाहन पंतप्रधान मोदी यांनी नागरिकांना केले आहे. PM Modi’s Speech in Hyderabad (माहितीकरता – दरवर्षी 3–4 कोटी भारतीय परदेशात जातात, आणि पर्यटनावरच अंदाजे ₹1.5 लाख कोटींच्या आसपास परकीय चलन खर्च होते.)

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर माध्यमांजवळ बोलताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जगात तेल आणि गॅसची कमतरता आहे. आपल्या शेजारी देशांमध्ये वाईट अवस्था आहे. इंधनाचे दर वाढत आहेत. पाकिस्तानमध्ये पेट्रोलचे दर साडेचारशे रुपये प्रति लिटर पेक्षा जास्त झाले आहेत. संकटाची तीव्रता वाढत असूनही पंतप्रधान मोदींनी देशातील पुरवठा साखळीत खंड पडू दिला नाही. आपल्याला आजही तेल आणि गॅस मिळत आहे. पण भविष्यातले संकट टाळण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद देणे आवश्यक आहे. PM Modi’s Speech in Hyderabad

    मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इनके द्वारा तेल और गैस को लेकर की गई अपिल पर देशवासी अमल करें।

    (नागपुर। 10-5-2026)@narendramodi #Maharashtra #Nagpur pic.twitter.com/p4GGxEh1ss

    — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 10, 2026
    Tags: Cooking OilForeign CurrencyGoldGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarPM Modi's Speech in HyderabadSave Oilखाद्य तेलटॉप न्युजडिझेलताज्या बातम्यापंतप्रधान नरेंद्र मोदीपरकीय चलनपेट्रोलमराठी बातम्यालोकल न्युजसोने
    Share16SendTweet10
    Mayuresh Patnakar

    Mayuresh Patnakar

    1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

    • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
    • संपर्क

    Copyright © 2020-2023 Guhagar News.

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In
    No Result
    View All Result
    • Guhagar
    • Ratnagiri
    • Maharashtra
    • Bharat
    • Politics
    • Sports
    • Travel
    • Health

    Copyright © 2020-2023 Guhagar News.