गुहागर, ता. 25 : डॉ. तात्यासाहेब नातू स्मृती प्रतिष्ठान व जनशिक्षण संस्थान रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने प्लम्बिंग कोर्स सुरु करण्यात येत आहे. कौशल्य विकास योजने अंतर्गत श्रीसिद्धिविनायक विद्यामंदिर मुंढर येथे हा कोर्स शनिवार, रविवार पूर्ण दिवस चालणार आहे. Plumbing course started at Mundhar

जे विद्यार्थी सध्या प्लम्बिंगचे काम करतात परंतु त्यांच्याकडे सर्टिफिकेट नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स अत्यंत महत्वाचा आहे. गुहागर तालुक्यात हा कोर्स पाहिल्यांदाच सुरु होत आहे. तरी याचा फायदा जास्तीत जास्त तालुक्यातील लोकांना व्हावा, असा संस्थेचा माणस आहे. हा कोर्स 1 डिसेंबर 2023 पासून सुरु करण्यात येणार आहे. हा कोर्स शिकविण्यासाठी श्रीसिद्धिविनायक विद्यामंदिर मुंढर येथे सुसज्य ट्रेनींग सेंटर तयार करण्यात आले आहे. तरी प्लम्बिंग कोर्स प्रवेशासाठी श्री.अनंत साठे – 8888265965, श्री. दिलीप बडद – 9689988809, श्री. सचिन विचारे – 9921995605 यांच्याकडे संपर्क करावा. Plumbing course started at Mundhar
