झोंबडीतील घटना, वाद झाल्याने स्पर्धा अर्ध्यावर रद्द
गुहागर, ता. 06 : तालुक्यातील झोंबडी येथे काळभैरव ग्रामस्थ मंडळातर्फे भात लावणी व नांगरणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी परवानगी घेतलेली नसल्याने गुहागर पोलीसांनी समीर तावडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची तक्रार मनोहर दत्ताराम चाळके, सती चिंचघरी ता. चिपळूण यांनी गुहागर पोलीस ठाण्यात दिली होती. Plowing competition

5 ऑगस्टला झोंबडी येथे काळभैरव ग्रामस्थ मंडळातर्फे भात लावणी व नांगरणी स्पर्धेचे आयोजन समीर तावडे यांनी केले होते. या स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसादही मिळाला होता. सुमारे 50 बैलजोड्या घेवून शेतकरी या स्पर्धेसाठी झोंबडीमध्ये उपस्थित होते. स्पर्धेचे उद्घाटनसाठी भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू, गुहागर तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे आदी आले होते. स्पर्धेदरम्यान सहभाग घेण्यावरुन स्पर्धकांमध्येच वादावादी झाली. त्यामुळे ही स्पर्धा कोणत्याही निर्णयाविना अर्ध्यावरच रद्द करावी लागली. Plowing competition
दरम्यान स्पर्धा पहाण्यासाठी आलेले मनोहर चाळके यांनी आयोजन समीर तावडे यांच्याकडे नांगरणी स्पर्धेकरीता शासनाची परवानगी घेतली आहे का. याची चौकशी केली. ही परवानगी घेतलेली नसल्याने मनोहर चाळके यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात संपर्क केला. त्यानंतर चिपळूणचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हे घटनास्थळ गुहागर पोलीस कार्यक्षेत्रात येत असल्याने मनोहर चाळके यांना सोबत घेवून चिपळूण पोलीस गुहागर पोलीस ठाण्यात आले. तेथे मनोहर चाळके यांनी तक्रार दिली. Plowing competition

या तक्रारीत चाळके यांनी म्हटले आहे की, शासनाची परवानगी न घेता व मनाई आदेश असताना नांगरणी स्पर्धेचे आयोजन समीर तावडे यांनी केले. याद्वारे बैलांना नांगरासह चिखलात त्रास होईल, अशा पध्दतीने पळण्यासाठी मैदात तयार करण्यात आले होते. या मैदानात बैलांना नांगराला जुंपुन यातना व वेदना होतील अशा पध्दतीने पळविण्यात आले. म्हणून समीर तावडे व इतरांविरुध्द मी तक्रार करत आहे. या तक्रारीनंतर प्राण्यांना निर्दयतेने वागविणे प्रतिबंधात्मक अधिनियमाखाली समीर तावडेंवर गुहागर पोलीसांनी गुन्हा नोंदविला आहे. Plowing competition
