• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
17 September 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आवरे ते कोसंबीपुल या रस्त्याची दुर्दशा!

by Guhagar News
March 15, 2023
in Guhagar
96 1
0
Plight of the road from Aaware to Kosambipul
189
SHARES
539
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात; कुणबी एकता प्रतिष्ठानचे तहसीलदारांना निवेदन

गुहागर, ता. 15 : तालुक्यातील आवरे – खोपटी – भातगाव – कोळवली – कोसंबी पुल या रस्त्याची भयानक दुर्दशा झाली आहे. लोक जीव मुठीत घेऊन या मार्गावरून प्रवास करत आहेत. हा रस्ता मे २०२३ पर्यंत दुरुस्त न झाल्यास येथील ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. सदर रस्ता दुरुस्तीबाबत विशेष लक्ष घालण्यासाठी तहसीलदार प्रतिभा वराळे यांना कुणबी एकता प्रतिष्ठान, भातगावच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. Plight of the road from Aaware to Kosambipul

गेली अनेक वर्षे हा रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक बनला असून वारंवार मागणी करूनही या रस्त्याचे डांबरीकरण केले जात नाही. या भागातील अनेक गावांना जोडणारा हा रस्ता असून दशक्रोशीतील ग्रामस्थांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन या मार्गावरून प्रवास करावा लागत आहे. सदरची बाब संबंधित विभागाच्या निदर्शनास आणून देखील या भागातील लोकांच्या रास्त मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे. कुणबी एकता प्रतिष्ठान, भातगावच्यावतीने याबाबत पंचायत समिती, गुहागरच्या गटविकास अधिकाऱ्यांना देखील निवेदन देण्यात आले आहे. Plight of the road from Aaware to Kosambipul

या मार्गावरील अनेक गावांमधील ग्रामस्थांना, वाहनचालक, विद्यार्थी, गरोदर महिला, वृध्द, रुग्ण यांना या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. ही बाब या निवेदनामध्ये निदर्शनास आणून देण्यात आली आहे. सदर रस्ता हा पूर्णतः उखडला असून अपघातांना आमंत्रण ठरत आहे. संबंधित विभाग या मार्गावर रस्त्याच्या दुरावस्थेचा बळी जाण्याची वाट पाहत आहे का? असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी केला आहे. Plight of the road from Aaware to Kosambipul

शिमगा आणि पालखी उत्सव सध्या कोकणात सर्वत्र उत्साहात सुरू आहे. प्रत्येक गावात ग्रामदेवतेच्या पालख्या घरोघरी अनवाणी नेल्या जातात. आवरे गावापासून कोसंबी पुलापर्यंतचा रस्ता पूर्णपणे उखडला असल्याने ग्रामस्थांना ग्रामदेवतेच्या पालख्या घरी नेताना असह्य त्रास सहन करावा लागत आहे. निवडणुकीच्या काळात मतांचा जोगवा सर्वसामान्य लोकांच्या घरोघरी जाऊन मागणाऱ्या पुढाऱ्यांना आता लोकांच्या समस्या सोडवायला वेळ नाही. ग्रामस्थांनी सगळ्या प्रकारचे सर्व प्रयत्न केले. मात्र पदरी निराशाच आली. मात्र आता आमच्या निवेदनाची तातडीने दखल घेऊन या रस्त्याचे डांबरीकरण माहे मे २०२३ पर्यंत पूर्ण न झाल्यास कुणबी एकता प्रतिष्ठान, भातगाव ग्रामस्थांसह उग्र आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. Plight of the road from Aaware to Kosambipul

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarPlight of the road from Aaware to KosambipulUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share76SendTweet47
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.