• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

वेळणेश्वर अभियांत्रिकी महाविद्यालयात PLC कार्यशाळा

by Ganesh Dhanawade
March 14, 2023
in Guhagar
128 1
0
वेळणेश्वर अभियांत्रिकी महाविद्यालयात PLC कार्यशाळा
251
SHARES
718
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता.14 : तालुक्यातील वेळणेश्वर येथील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात (Maharishi Parashuram College of Engineering) विद्युत अभियांत्रिकी विभागातर्फे १ ते ३ मार्च असे तीन दिवस कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या विद्युत आणि इंस्ट्रुमेंटेशन (उपकरणीय) विभागांच्या विद्यार्थ्यांसाठी अर्थात प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोलरवर (Programmable logic control) कार्यशाळा घेण्यात आली होती. या कार्यशाळेसाठी भाभा परमाणू संशोधन केंद्रातील निवृत्त ज्येष्ठ संशोधक श्री. बीएसवीजी शर्मा हे प्रमुख व्याख्याते म्हणून लाभले. PLC Workshop at Valneshwar College

या कार्यशाळेची सुरुवात १ मार्च रोजी सकाळी झाली. सलग तीन दिवस संपूर्ण दिवसभर चाललेल्या या अभिनव कार्यशाळेत श्री. शर्मा यांनी पीएलसी संदर्भातल्या शक्य तेवढ्या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांना शिकवल्या. पीएलसीचा उगम, त्याचे फायदे, प्रोग्रामिंग, लॅडर डायग्रॅम, या आणि अशा अनेक गोष्टी विद्यार्थ्यांना शिकवण्यात आल्या. त्यावर आधारित एक प्रश्नमंजुषा सुद्धा आयोजित करण्यात आली होती. तसेच काही छोटे प्रायोगिक तत्त्वावर विद्यार्थ्यांना पीएलसी हाताळण्यास देऊन छोटे प्रकल्प साकारत येतील, असे प्रात्यक्षिक सुद्धा घेतले गेले. PLC Workshop at Valneshwar College

दि. ३ मार्च रोजी या कार्यशाळेची सांगता झाली. प्रस्तुत कार्यशाळेच्या यशस्वीततेकरिता विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजय बेडेकर, महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र सोनी, विद्युत विभागप्रमुख श्री. सतिश घोरपडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्युत विभागाच्या सर्वच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या कार्यशाळेच्या यशस्वीततेकरिता मेहनत घेतली. या कार्यशाळेसाठी महाविद्यालयाच्या विद्युत आणि इंस्ट्रुमेंटेशन (उपकरणीय) या विभागाच्या सुमारे ५० हुन अधिक विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला होता. PLC Workshop at Valneshwar College

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarPLC Workshop at Valneshwar CollegeUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share100SendTweet63
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.