रत्नागिरी, ता. 28 : जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी राज्यातील प्रतिभावान खेळाडूंची निवड करुन त्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षण, संतुलीत आहार व अद्यावत क्रीडा सुविधा पुरवून त्यासाठी सुसंघटीत प्रयत्न करण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, शिवछत्रपती क्रीडापीठ म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे अंतर्गत राज्यात विविध क्रीडा प्रबोधिनी कार्यरत आहेत. सन २०२४-२५ साठी शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत या ०९ क्रीडा प्रबोधिनीत सरळप्रवेश (५०%) व कौशल्य चाचणी (५०%) प्रक्रियेअंतर्गत खालील निकषानुसार निवासी व अनिवासी प्रवेश देण्यात येणार आहेत. Players should apply for department level test
विभागस्तर चाचणीकरिता पात्रता निकषात पात्र असलेल्या खेळाडूंनी आपले अर्ज (खेळाडूचे नाव, जिल्हा, खेळप्रकार, जन्मदिनांक, वय व क्रीडा कामगिरी प्रमाणपत्र) जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, प्लॉट नं.ओएस-१५, मिरजोळे एम. आय. डी. सी. रत्नागिरी येथे दि. ४ जुलै २०२४ रोजी पर्यंत कार्यालयीन वेळेत जमा करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केले आहे. Players should apply for department level test
राज्यात पुणे, कोल्हापूर, ठाणे, अमरावती, अकोला, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, गडचिरोली अशा ९ ठिकाणी क्रीडा प्रबोधिनीची स्थापना करण्यात आली होती. सदर ठिकाणी क्रीडा प्रबोधिनीमध्ये क्रीडा प्रशिक्षणार्थीची निवड करण्यासाठी प्रवेश प्रक्रीया राबवण्यात येणार आहे. यामध्ये ज्युदो, जिम्नॅस्टीक्स, हॉकी, शुटींग, फुटबॉल, जलतरण, अॕथलेटिक्स, कुस्ती, बॅडमिंटन, आर्चरी, हॅन्डबॉल, टेबल टेनिस, वेटलिफ्टिंग, ट्रायथलॉन, सायकलिंग, बॉक्सींग अशा १७ क्रीडा प्रकारात प्रशिक्षण देण्यात येते. Players should apply for department level test
क्रीडा प्रबोधिनीतील असलेल्या संबंधित खेळात राज्यस्तरावर पदक प्राप्त केलेले खेळाडू किंवा राष्ट्रीय स्तरावर राज्याचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू ज्यांचे वय १९ वर्ष आतील आहे अशा खेळाडूंना संबंधित खेळाबाबतची चाचणी तज्ज्ञ समिती समक्ष देऊन प्रवेश निश्चित केला जातो. खेळनिहाय कौशल्य चाचणीचे आयोजन करुन गुणानुक्रमे प्रवेश निश्चित केला जातो. या चाचण्यांमध्ये निवड झालेल्या खेळाडूंची वैद्यकीय पथकाव्दारे चाचणी घेवून क्रीडा प्रबोधिनीमध्ये शारीरिकदृष्ट्या सुदृढ खेळाडूंची निवड अंतिम करण्यात येते. Players should apply for department level test
सर्वसाधारण सूचना (विभाग व राज्यस्तर चाचणी करिता)
या चाचण्यांकरिता येणाऱ्या खेळाडूंनी स्वतः निवास व भोजन व्यवस्था वैयक्तिक स्तरावर करावयाची आहे. या चाचण्यांकरिता येणाऱ्या खेळाडूंनी संबंधित स्पर्धेचे प्राविण्य / सहभाग प्रमाणपत्र, वयाचा पुरावा इ माहिती चाचणीस्थळी आणणे बंधनकारक आहे. सदर मान्यतेत निवड प्रक्रिया राबविताना सरळ प्रवेश प्रक्रियेन्वये जर इच्छुकांची संख्या ५०% पेक्षा जास्त असेल तर अशा प्रकरणी प्रथम त्यांना प्राधान्याने प्रवेश देण्यात यावा व उर्वरित जागांवर कौशल्य चाचणीव्दारे प्रवेश देण्यात यावा. मैदानी / सायकलिंग / शुटींग या खेळाकरिता राज्य निपुणता केंद्र २० वर्ष वयोगट अंतर्गत चाचणी आयोजित करण्यात येणार आहेत व उर्वरित खेळाकरिता १९ वर्षाआतील मर्यादा असेल. मिशन लक्षवेध अंतर्गत असलेल्या खेळाकरिता मैदानी / आर्चरी / बॉक्सिंग / वेटलिफ्टिंग / हॉकी/ कुस्ती / शुटींग / टेबल टेनिस / बॕडमिंटन या खेळकरिता सरळ प्रवेश (राज्यस्तर पदक किंवा राष्ट्रीय सहभाग) असलेल्या खेळाडूंची चाचणी आयोजित होतील. हॅंडबॉल/ जलतरण/सायकलिंग/फूटबॉल/जुदो/जिम्नॅस्टिक्स या खेळांकरिता सरळ प्रवेश व कौशल्य चाचणी (राज्यस्तर सहभाग असलेले खेळाडू) अशा दोन्ही प्रक्रियेद्वारे चाचण्या आयोजित कराव्यात. मैदानी / सायकलिंग / शुटींग या खेळाकरिता राज्य निपुणता केंद्र २० वर्ष वयोगट अंतर्गत चाचणी आयोजित कराव्यात, उरलेल्या खेळाकरिता १९ वर्षाआतील मर्यादा असेल. एखाद्या खेळात राज्यभरात विभागनिहाय चाचणी करिता खेळाडूंची संख्या कमी आल्यास सदर खेळाची चाचणी विभागस्तरावर आयोजित न करता सरळ राज्यस्तरावर होईल. Players should apply for department level test
विभागस्तरावर चाचण्याचे आयोजन दिनांक ८ ते ९ जुलै २०२४ या कालावधित आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच विभागस्तरावर निवड झालेल्या खेळाडूंची राज्यस्तर चाचणी दि. १५ जुलै ते १८ जुलै २०२४ या कालावधित खेळनिहाय राज्यातील विविध क्रीडा प्रबोधिनीच्या ठिकाणी घेण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी सचिन मांडवकर, क्रीडा मार्गदर्शक (८४०८८६५८७०) यांच्याशी संपर्क साधावा. Players should apply for department level test