सह्याद्री निसर्ग मित्र चिपळूण यांच्यावतीने आयोजन
गुहागर, ता. 29 : न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे येथे सह्याद्री निसर्ग मित्र चिपळूण यांच्यावतीने प्लास्टिक संकलनाचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी घरून आणलेले प्लास्टिक जमा करण्यात आले. तसेच शृंगारतळी बाजारपेठ, पालपेणे रोड, पाटन्हाळे रोड, मळण रोड अशा सर्व परिसरातील प्लास्टिक जमा करण्यात आले. यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला हॅन्ड ग्लोव्हज व प्लास्टिक संकलनासाठी बॅग देण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांनी अत्यंत परिश्रमाने व काळजीपूर्वक प्लास्टिकचे संकलन केले. Plastic collection event at Patpanhale
यावेळी मुख्याध्यापक पाटील व्ही डी व पर्यवेक्षक नेर्ले सर यांनी श्री. सोहम घोरपडे, श्री. राजेंद्र हुंबरे व श्री दिनेश धुमक यांचे स्वागत केले. घोरपडे सर व धुमक सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्लास्टिकचा वापर टाळावा, प्लास्टिक मुळे सर्वत्र प्रदूषण होते, प्लास्टिक हे भूमातेसाठी कशा पद्धतीने धोकादायक आहे ते सांगितले. यावेळी इयत्ता सहावी मधील विद्यार्थिनी कु .जुई लक्ष्मण बारे हिने सर्वाधिक प्लास्टिक संकलन केले म्हणून बक्षीस देऊन तिला गौरविण्यात आले. यानंतर सर्व विद्यार्थ्यांना सह्याद्री निसर्ग मित्र चिपळूण यांच्यावतीने नाष्टा देण्यात आला. Plastic collection event at Patpanhale
या कार्यक्रमाचे नियोजन सौ वैद्य एन .पी व श्री पवार व्ही व्ही . यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक व सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचे उत्तम सहकार्य लाभले. Plastic collection event at Patpanhale